Skip to main content

Posts

Showing posts from August, 2026

मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात, 'या' तारखेपर्यंत नोंदवता येणार हरकती...!

 *मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी* *विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात, 'या' तारखेपर्यंत नोंदवता येणार हरकती...!* ठाणे,दि.31 अगस्त 2026: १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम - २०२६ जाहीर करण्यात आला असून आज, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.       या प्रारूप यादीनुसार १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ४५ लाख ९१ हजार १३८ मतदार नोंदवले गेले असून यात २३ लाख ५० हजार ७९५ पुरुष, २२ लाख ३९ हजार ६४९ महिला आणि ६९४ इतर मतदारांचा समावेश आहे. नागरिकांच्या सोयीसाठी एकूण ६ हजार ८३१ मतदान केंद्रांवर ही प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली असून मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच पदनिर्देशित ठिकाणी ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली आहे तसेच जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना ही प्रारूप मतदारयादी देण्यात येत आहे.      या मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना मतदारयादीबाबतचे आपले दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. ज्या नागर...

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका के जन्म-मृत्यु विभाग में सर्वर व नेटवर्क ठप, अधिकारी-नागरिक दोनों परेशान

 भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका के जन्म-मृत्यु विभाग में सर्वर व नेटवर्क ठप, अधिकारी-नागरिक दोनों परेशान भिवंडी 24 अगस्त 2026 जनहित में विशेष रिपोर्ट भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका के जन्म-मृत्यु विभाग में सर्वर और नेटवर्क की लगातार समस्या से पूरा कामकाज ठप पड़ा हुआ है। विभाग में काम करने वाले अधिकारी-कर्मचारी और प्रमाणपत्र बनवाने आए आम नागरिक दोनों ही भारी परेशानी का सामना कर रहे हैं। विभाग में पहुंचने वाले नागरिकों को बार-बार यही जवाब मिल रहा है कि “सर्वर डाउन है” या “नेटवर्क नहीं चल रहा”। जन्म प्रमाणपत्र, मृत्यु प्रमाणपत्र, नाम सुधार या पुराने रिकॉर्ड निकालने के लिए आए लोग घंटों कतार में खड़े रहने के बाद भी खाली हाथ लौटने को मजबूर हो रहे हैं।  कई परिवारों को स्कूल एडमिशन, पासपोर्ट, बैंक अधार कार्ड राशन कार्ड पेन कार्ड ड्राइविंग लाइसेंस दिव्यांग लोगों का पेंशन वह अन्य दस्तावेज काम, संपत्ति संबंधी दस्तावेज या अन्य जरूरी कागजात के लिए बार-बार दफ्तर के चक्कर लगाने पड़ रहे हैं। विभाग के कर्मचारियों का भी कहना है कि तकनीकी खराबी के कारण वे नागरिकों की मदद नहीं कर पा रहे। एक क...

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: अग्निवीरांसाठी १ हजार अधिसंख्य पदे, उच्चस्तरीय समिती गठीत!

 महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: अग्निवीरांसाठी १ हजार अधिसंख्य पदे, उच्चस्तरीय समिती गठीत! मुंबई, २८ ऑगस्ट २०२६ सैन्यदलातून अग्निवीर म्हणून चार वर्षांची सेवा पूर्ण करून परतणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त गणवेशधारी गट-क संवर्गात माजी अग्निवीरांना पुनर्नियुक्ती देण्यासाठी एक हजार अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, या पदांवर नियुक्तीची पद्धत निश्चित करण्यासाठी आणि त्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सचिव समिती गठीत करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग आणि नगरविकास विभाग यांसारख्या विभागांमध्ये ही पदे निर्माण केली जाणार आहेत. यात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, कारागृह रक्षक, अग्निशामक/बचावकर्ता, गृह रक्षक दलातील पदे, उत्पादन शुल्क जवान व वाहनचालक, वनरक्षक तसेच महापालिका-नगरपालिकांमधील अग्निशामक पदे यांचा समावेश आ...

महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना २३ कोटी ३३ लाखांची मदत मंजूर

 महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना २३ कोटी ३३ लाखांची मदत मंजूर मुंबई / पुणे | ३० ऑगस्ट २०२६ महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी २७ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जून आणि जुलै २०२६ महिन्यांत अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ आणि गारपीटमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यात येणार आहे. या निर्णयाअंतर्गत एकूण ₹२३ कोटी ३३ लाख ३१ हजार इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या मदतीचा लाभ १७,२४५ शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे ११,२०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ही मदत अमरावती, पुणे, नागपूर आणि कोकण या चार विभागांतील शेतकऱ्यांना देण्यात येईल. अमरावती विभागाला, विशेषतः बुलढाणा जिल्ह्याला यात सर्वाधिक वाटा मिळाला आहे. मदत Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ही मदत रक्कम शेतकऱ्यांच्या जुन्या कर्ज खात्यात किंवा वसुलीसाठी वळती करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना बँकांना याबाबत कडक सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आह...

श्रावण पूर्णिमा पर यह पर्व भाई-बहन के पवित्र बंधन का प्रतीक है। बहनें राखी बाँधती हैं और भाई रक्षा का वचन देते हैं।

श्रावण पूर्णिमा तिथि 27 अगस्त 2026 को सुबह लगभग 9:08 बजे शुरू होती है और 28 अगस्त को सुबह लगभग 9:48 बजे समाप्त होती है। भद्रा काल 27 अगस्त को रहता है, इसलिए राखी बांधने का शुभ समय 28 अगस्त की सुबह (उदया तिथि के अनुसार) माना जाता है।  रक्षाबंधन हिंदू धर्म (और जैन धर्म में भी) का एक प्रमुख पर्व है, जो श्रावण मास की पूर्णिमा को मनाया जाता है। इसका अर्थ है “रक्षा का बंधन”। यह मुख्य रूप से भाई-बहन के पवित्र संबंध, स्नेह, विश्वास और रक्षा के वचन का प्रतीक है। बहन भाई की कलाई पर राखी (रक्षासूत्र) बांधती है और भाई उसकी रक्षा का वचन देता है। धार्मिक और वैदिक मान्यताएं वैदिक साहित्य में रक्षासूत्र का उल्लेख शारीरिक, मानसिक और आध्यात्मिक सुरक्षा से जुड़ा है। अथर्ववेद में रक्षा सूत्र का वर्णन मिलता है। प्राचीन काल में ब्राह्मण यजमानों, राजाओं या गुरु शिष्यों को रक्षासूत्र बांधते थे। यह केवल भाई-बहन तक सीमित नहीं था; पत्नी-पति, गुरु-शिष्य आदि संबंधों में भी बांधा जाता था। रक्षासूत्र बांधते समय प्रचलित मंत्र है: “येन बद्धो बलिराजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल॥” (अर्था...

आरोग्य सेवक महिला पदावरून आरोग्य सहाय्यक महिला पदावर ३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते समुपदेशन व पदोन्नती आदेशांचे वितरण

जिल्हा परिषद, ठाणे *आरोग्य सेवक महिला पदावरून आरोग्य सहाय्यक महिला पदावर ३० कर्मचाऱ्यांना पदोन्नती* *मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते समुपदेशन व पदोन्नती आदेशांचे वितरण* ठाणे, दि. २७ ऑगस्ट २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद, ठाणेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक महिला पदावर कार्यरत असलेल्या ३० कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक महिला या पदावर पदोन्नती देण्यात आली. यानिमित्ताने आज, दि. २७ ऑगस्ट, २०२६ रोजी जिल्हा परिषद, ठाणेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते पदोन्नती आदेश वितरित करण्यात आले. यावेळी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करून त्यांच्या नव्या जबाबदाऱ्या व कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आरोग्य सेवक महिला व आरोग्य सहाय्यक महिला यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आरोग्यविषयक विविध योजना, माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती तसेच प्रतिबंध...

भिवंडी राशन ऑफिस में ‘सर्वर/नेट डाउन’ की शिकायतें: नागरिक और अधिकारी दोनों परेशान, समाधान की जरूरत

  भिवंडी राशन ऑफिस में ‘सर्वर/नेट डाउन’ की शिकायतें: नागरिक और अधिकारी दोनों परेशान, समाधान की जरूरत भिवंडी (ठाणे) के राशन कार्यालय में पिछले कई दिनों से नागरिकों को बार-बार यही जवाब मिल रहा है— “सर्वर नहीं चल रहा” या “नेटवर्क डाउन है”। नया राशन कार्ड बनवाने, नाम जोड़ने-कटाने, सुधार, डुप्लिकेट कार्ड या अन्य कामों के लिए पहुंचे लोग घंटों इंतजार के बाद खाली हाथ लौट रहे हैं। राशन कार्ड कई सरकारी योजनाओं और रोजमर्रा की जरूरतों का आधार होने के कारण यह समस्या जनहित से जुड़ी है। राज्य स्तर पर महाराष्ट्र के आधिकारिक पोर्टल (RCMS – rcms.mahafood.gov.in और संबंधित e-PDS/AePDS सिस्टम) 26-27 अगस्त 2026 तक सक्रिय दिख रहे हैं। राज्यव्यापी बड़े सर्वर आउटेज की कोई आधिकारिक घोषणा या व्यापक रिपोर्ट फिलहाल उपलब्ध नहीं है। Fair Price Shops पर e-POS मशीनों के जरिए वितरण का काम भी कई जगहों पर चल रहा है। फिर भी लोकल स्तर पर इंटरनेट, बिजली, मशीन या कनेक्टिविटी की समस्याएं समय-समय पर आती रहती हैं। पिछले महीनों में महाराष्ट्र समेत कई राज्यों में e-POS/RCMS से जुड़ी तकनीकी अड़चनों की खबरें आई हैं। दोनों पक्ष...

नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करण्यात येत आहे.

 नेपाळमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक माहिती संकलित करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील जे नागरिक/पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले आहेत, अथवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीची माहिती महाराष्ट्र शासनाच्या खालील “सहायता” पोर्टलवर तातडीने नोंदवावी. महाराष्ट्र शासन – Emergency Evacuation Registration Portal : https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ सदर पोर्टलवर संबंधित व्यक्तीचे नाव, पासपोर्ट क्रमांक, मोबाईल/WhatsApp क्रमांक, महाराष्ट्रातील पत्ता व जिल्हा, आपत्कालीन संपर्क क्रमांक, सध्याचा देश/शहर व पत्ता, GPS Location, Visa Details, सोबत असलेल्या व्यक्तींची संख्या, जवळचे विमानतळ तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असल्यास त्याबाबतची माहिती भरता येईल. तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्याशीही संपर्क साधावा.  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष ठाणे जिल्ह्यातील संबंधित नागरिक व त्...

शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

जिल्हा परिषद, ठाणे *शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण* *ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल* ठाणे, दि. २५ ऑगस्ट २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिककेंद्रित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या “आरोग्य संस्थांचे लोकार्पण व विविध समिती सदस्यांशी आरोग्य संवाद” या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वासिंद यांच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उत्साहात संपन्न झाले. या राज्यस्तरीय कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, सार्वजनिक आरोग्य आयुक्त संजय काटकर, आयुक्त, शहरी आरोग्य डॉ. सुनील भोकरे तसेच संचालक डॉ. नितीन कंदेवाड हे दूरदृश्य...

आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांच्या संकल्पनेतून ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास *‘World Record of Excellence, England’ च्या जागतिक विक्रम प्रयत्नांतर्गत देशभक्ती, भारतीय वारसा आणि संस्कृतीचा भव्य रनवे* *वीर जवानांच्या सन्मानार्थ ४ ते ९४ वयोगटातील १०० हून अधिक नागरिकांची ऐतिहासिक मानवंदना* *सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ₹१,००,००१ देणगीची घोषणा* *मनोज सानप यांच्या ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री प्रयोगाने सभागृह भारावले*

 *आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांच्या संकल्पनेतून ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’चा जागतिक विक्रमाकडे ऐतिहासिक प्रवास* *‘World Record of Excellence, England’ च्या जागतिक विक्रम प्रयत्नांतर्गत देशभक्ती, भारतीय वारसा आणि संस्कृतीचा भव्य रनवे* *वीर जवानांच्या सन्मानार्थ ४ ते ९४ वयोगटातील १०० हून अधिक नागरिकांची ऐतिहासिक मानवंदना* *सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ₹१,००,००१ देणगीची घोषणा* *मनोज सानप यांच्या ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री प्रयोगाने सभागृह भारावले* मुंबई,दि.24: अगस्त 2026 आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांच्या संकल्पनेतून आणि ASVFI Foundation व Valiant Fame Icon (VFI) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’ हा World Record of Excellence, England च्या जागतिक विक्रम प्रयत्नांतर्गत आयोजित करण्यात आलेला Heritage, Cultural & Patriotic Runway लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात उत्साहात पार पडला.          कारगिल विजय दिवस आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाने देशभक्ती, भारतीय संस्कृती आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा प्रेरणादायी संगम...

हर हर महादेव..!! बम बम भोले..!!

 हर हर महादेव..!!         बम बम भोले..!! कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून हिंगोलीतील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिरापर्यंत निघालेल्या भव्य कावड यात्रेत आज सहभागी होण्याचा आणि या अभूतपूर्व भक्तिसागराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा योग आला. हजारो शिवभक्तांच्या श्रद्धेने, उत्साहाने आणि ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने यात्रा मार्ग अक्षरशः शिवमय झाला. खांद्यावर कावड, हातात भगवा ध्वज, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि ओठांवर महादेवाचे नामस्मरण... डोळ्यांसमोर दिसणारा हा अथांग शिवभक्तांचा जनसागर पाहून मन अक्षरशः भारावून गेले. ढोल-ताशांचा निनाद, डौलाने फडकणारे भगवा ध्वज, आणि प्रत्येक पावलागणिक घुमणारा ‘हर हर महादेव’चा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. या भव्य यात्रेच्या आयोजनामागे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. संतोष बांगर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमची अथक मेहनत आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी सुरू असलेली ही परंपरा आज केवळ एक धार्मिक कार्यक्रम राहिलेली नसून हिंगोली आणि संपूर्ण मराठवाड्याच्या धार्मिक-सामाजिक जीवनातील...