जिल्हा परिषद, ठाणे *उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव* *ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक उपक्रमांवर भर* ठाणे, दि. ४ सप्टेंबर, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत आज, दि. ०४ सप्टेंबर, २०२६ रोजी बी. जे. हायस्कुल येथे ‘जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७’ सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, उपशिक्षणाधिकारी संदीप पाटील, नगरसेवक ...