विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे;* *जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांची शासकीय आश्रमशाळा मढ येथे सदिच्छा भेट*
*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे;* *जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांची शासकीय आश्रमशाळा मढ येथे सदिच्छा भेट* ठाणे, दिनांक :- 17/10/2026 : शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला योग्य दिशा देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मुरबाड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा मढ येथे आज सदिच्छा भेट दिली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या प्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, सहायक प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगतानाच नियमित अभ्यास, शिस्त, आत्मविश्वास आणि आयुष्यात स्वतःचे ध्येय निश्चित ...