मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात, 'या' तारखेपर्यंत नोंदवता येणार हरकती...!
*मतदार यादीत नाव नोंदवण्याची सुवर्णसंधी*
*विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला सुरुवात, 'या' तारखेपर्यंत नोंदवता येणार हरकती...!*
ठाणे,दि.31 अगस्त 2026: १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम - २०२६ जाहीर करण्यात आला असून आज, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रारूप यादीनुसार १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ४५ लाख ९१ हजार १३८ मतदार नोंदवले गेले असून यात २३ लाख ५० हजार ७९५ पुरुष, २२ लाख ३९ हजार ६४९ महिला आणि ६९४ इतर मतदारांचा समावेश आहे. नागरिकांच्या सोयीसाठी एकूण ६ हजार ८३१ मतदान केंद्रांवर ही प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली असून मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच पदनिर्देशित ठिकाणी ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली आहे तसेच जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना ही प्रारूप मतदारयादी देण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना मतदारयादीबाबतचे आपले दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. ज्या नागरिकांना मतदारयादीत नवीन नाव समाविष्ट करायचे आहे त्यांनी नमुना क्र. ६, नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७, तर नावातील अथवा पत्त्यातील दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ योग्य त्या कागदपत्रांसह व घोषणापत्रासह दाखल करावयाचा आहे.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुनावणी घेऊन ते निकालात काढले जातील आणि त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल.
या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी प्राप्त दावे व हरकतींची अद्ययावत यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत दर आठवड्याला मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात येणार आहे.
नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी द्विस्तरीय अपील यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली असून मतदार नोंदणी अधिकारी यांनी घेतलेला निर्णय मान्य नसल्यास संबंधितांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे प्रथम अपील दाखल करता येईल. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयावरही समाधान न झाल्यास मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दुसरे अपील करण्याची कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे.
पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन मतदारयादीतील आपल्या नोंदींची वेळीच खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम🙏



Comments
Post a Comment