भोगवटादार वर्ग-2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शक परिपत्रक! 👉 वर्ग-2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करताना कोणते नियम लागू? शासनाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश!
🏠 भोगवटादार वर्ग-2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शक परिपत्रक 👉 वर्ग-2 जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करताना कोणते नियम लागू? शासनाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश! ✍️ महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी शासन परिपत्रक जारी करून भोगवटादार वर्ग-2 तसेच भाडेपट्ट्याने / कब्जेहक्काने धारण केलेल्या शासकीय जमिनींचे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रूपांतरण करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण व मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 📌 या परिपत्रकातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे : ✔️ प्रलंबित अर्जांना दिलासा: पूर्वी दाखल केलेले परंतु अंतिम आदेश प्रलंबित असलेले अर्ज नवीन 2025 च्या नियमांनुसार निकाली काढण्यात येतील. ✔️ मिश्र वापराच्या जमिनी: निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक अशा मिश्र वापरासाठी संबंधित क्षेत्राच्या प्रमाणात अधिमूल्य आकारले जाईल. ✔️ वापरातील बदल: कायदेशीररीत्या मंजूर झालेल्या वापरबदलाचा विचार करून अधिमूल्य निश्चित केले जाईल. ✔️ स्वयं-पुनर्विकासासाठी विशेष तरतूद: स्वयं-पुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना उप...