१आँक्टोबर ....राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसानिमित्त... मानवतावादी भावनेतून स्वैच्छिक रक्तदान ... दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या ‘सेवा पंधरवडा’ निमित्त देशभरात तसेच महाराष्ट्रात स्वैच्छिक रक्तदान जनजागृती व रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सेवा पंधरवडा व राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवसानिमित्त स्वैच्छिक रक्तदान मोहिमेला युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. तसेच १ ऑक्टोबर हा राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस म्हणून पाळला जात असून, या दिवसाच्या निमित्ताने स्वैच्छिक रक्तदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वैच्छिक रक्तदान शिबिरांत रक्तदात्यांनी ‘रक्तदान—जीवनदान’ या मानवतावादी भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार,राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, नँको, म. रा. एड्स नियंत्रण सो., रक्तसुरक्षा विभाग, राज्य रक्त संक्रमण परिषद तसेच संबंधित आरोग्य यंत्रणांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा उपक्रम दे...