भिवंडीत विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी विशेष शिबिर यशस्वी
भिवंडी, २९ सप्टेंबर २०२६: भिवंडी तालुक्यातील राहणाल परिसरातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन आज आगरी उन्नती समाज मंडळ, महानगरपालिका आणि ग्रामीण येथे करण्यात आले.
या शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे; इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे आणि तहसील कार्यालय, महसूल विभाग, भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. शिबिर ग्राम महसूल अधिकारी कामतघर हद्दीतील नारपोली शिवाजी नगर येथील लाभार्थ्यांसाठी होते.
शिबिरास मा. निवासी नायब तहसीलदार श्री. विशाल इंदुरकर, माजी सरपंच श्री. राजेंद्र मढवी, ग्रा.पं. सदस्य श्री. पंकज पाटील, अध्यक्ष श्री. नामदेव पाटील (आगरी समाज उन्नती मंडळ), सामाजिक कार्यकर्ता श्री. नंदू भाऊ पवार, श्रीमती इंदुबाई चव्हाण, सरपंच श्री. प्रताप पाटील, मंडळ अधिकारी श्री. योगेश भोजने, श्री. सुरेश गो. राठोड, श्री. अविनाश राऊत आणि ग्राम महसूल अधिकारी श्रीमती संजीवनी वानखडे आदी प्रमुख उपस्थित होते.
शिबिरात वाटप झालेल्या सेवा:
प्रमाणपत्रे व दाखले:
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र – ०२
उत्पन्नाचे दाखले – ३५
अधिवास / रहिवासी प्रमाणपत्र – ३६
शिधापत्रिका (रेशन कार्ड) – ०५
आधार नोंदणी / दुरुस्ती – २१
आरोग्य व योजना संबंधी सेवा:
आयुष्यमान भारत कार्ड (PMJAY) – २९
आभा (ABHA) कार्ड – ४६
मोफत आरोग्य तपासणी – ४९
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना – १०
संजय गांधी निराधार अनुदान योजना – १०
याशिवाय इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे यांच्या वतीने १५० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार योजना आणि कल्याणकारी योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यात आले.
सेतू केंद्र, तलाठी, मंडळ अधिकारी, आरोग्य विभाग आणि पुरवठा विभाग यांच्या समन्वयातून शिबिर यशस्वीपणे पार पडले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिर मा. उपविभागीय अधिकारी श्री. अमित सानप आणि तहसीलदार श्री. अभिजीत खोले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
या शिबिराच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील महानगरपालिका आणि ग्रामीण परिसरातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय प्रमाणपत्रे, दाखले आणि योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आला.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏











Comments