Skip to main content

जिल्हा परिषद, ठाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ ठाणे जिल्ह्यात आरोग्यसेवांचा व्यापक विस्तार; १०७ उपक्रमांतून १४,७८२ नागरिकांना लाभ आरोग्य तपासणी, NCD स्क्रीनिंग, मानसिक आरोग्य, पोषण, महिला आरोग्य, व्यसनमुक्ती व निरोगी जीवनशैली जनजागृतीला विशेष प्राधान्य

जिल्हा परिषद, ठाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’

ठाणे जिल्ह्यात आरोग्यसेवांचा व्यापक विस्तार; १०७ उपक्रमांतून १४,७८२ नागरिकांना लाभ

आरोग्य तपासणी, NCD स्क्रीनिंग, मानसिक आरोग्य, पोषण, महिला आरोग्य, व्यसनमुक्ती व निरोगी जीवनशैली जनजागृतीला विशेष प्राधान्य


 



ठाणे, दि. २९ सप्टेंबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात आरोग्य विभागांतर्गत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना, सेवा, आरोग्य तपासण्या, जनजागृती व समुपदेशन उपक्रम अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.


‘नागरिक प्रथम’ या दृष्टिकोनातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा प्रमुख उद्देश नागरिकांना दर्जेदार, सुलभ, तत्पर व नागरिक-केंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, तसेच आरोग्य संस्थांची कार्यक्षमता अधिक सक्षम करणे हा आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्याचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर अभियानांतर्गत विशेष भर देण्यात आला आहे.


१०७ उपक्रमांतून १४,७८२ नागरिकांना आरोग्यसेवांचा लाभ


ठाणे जिल्ह्यात अभियानांतर्गत विविध आरोग्यविषयक उपक्रम, तपासणी शिबिरे, जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आले आहेत. उपलब्ध जिल्हास्तरीय संकलित माहितीनुसार एकूण १०७ शिबिरे व उपक्रमांच्या माध्यमातून १४,७८२ नागरिकांना विविध आरोग्यसेवांचा लाभ मिळाला आहे.


यामध्ये १२ आरोग्य तपासणी शिबिरांतून ३,७६० नागरिकांची तपासणी, NCD तपासणीमध्ये २,३४१ नागरिकांची तपासणी, तर मानसिक आरोग्य स्क्रीनिंग व समुपदेशनातून ७१९ नागरिकांना सेवा देण्यात आली आहे.


तसेच निरोगी जीवनशैली जनजागृतीच्या माध्यमातून १,५२६ नागरिकांपर्यंत, पोषण व अॅनिमिया जनजागृतीद्वारे १,५५९ नागरिकांपर्यंत आणि व्यसनमुक्ती जनजागृती व समुपदेशनाद्वारे १,१२० नागरिकांपर्यंत आरोग्यविषयक संदेश पोहोचविण्यात आला आहे.


महिला आरोग्य व स्वच्छता, किशोरवयीन मुला-मुलींची क्षमता बांधणी, योग व ध्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे, मोतीबिंदू तपासणी तसेच आयुष्मान भारत कार्ड वाटप आदी उपक्रमांनाही अभियानात विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.


माता व बाल आरोग्याला विशेष प्राधान्य


माता व बाल आरोग्याच्या दृष्टीने अभियानांतर्गत मध्यम व तीव्र अॅनिमियाग्रस्त गर्भवती महिलांना FCM (Ferric Carboxy Maltose) इंजेक्शन, किशोरवयीन मुला-मुलींची क्षमता बांधणी तसेच Early & Exclusive Breastfeeding संदर्भातील जनजागृती व क्षमता बांधणीवर भर देण्यात येत आहे.


महिला व किशोरवयीनांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन आरोग्यविषयक माहिती, प्रतिबंधात्मक उपाय आणि आवश्यक मार्गदर्शन नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.


असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान


उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या तपासणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित विशेष आरोग्य शिबिरांमध्ये मधुमेह, रक्तदाब, मोतीबिंदू तसेच कर्करोग तपासणीचा समावेश करण्यात आला आहे.


तसेच ३० वर्षांवरील नागरिकांमध्ये कर्करोगासह विविध असंसर्गजन्य आजारांचे लवकर निदान करण्यासाठी स्क्रीनिंगवर विशेष भर देण्यात येत आहे. वेळेत तपासणी व निदानाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक उपचार व पुढील आरोग्यसेवेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


दुर्मिळ आजारांपासून अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेपर्यंत


अभियानांतर्गत दुर्मिळ आजारांसाठी कॉर्पस फंड, रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांची उपलब्धता तसेच ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर आवश्यक आरोग्यसेवा सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.


यामध्ये Hydroxyurea, Anti-Snake Venom (ASV), Anti-Rabies Vaccine (ARV) तसेच मधुमेह व उच्च रक्तदाबावरील औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उपाययोजनांचाही समावेश आहे.


ग्रामीण, प्राथमिक व नागरी आरोग्यसेवांना चालना


अभियानाच्या माध्यमातून आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये आरोग्य तपासणी तसेच CHO, ANM, MPW व ASHA यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासारख्या उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.


नागरी भागात UPHC स्तरावर आरोग्य शिबिरे आयोजित करण्याबरोबरच जनआरोग्य समिती, महिला आरोग्य समिती व एकात्मिक आरोग्य समिती यांच्या नियमित बैठका घेऊन आरोग्यसेवांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.


जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य व उपचाराचा पाठपुरावा


‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ आरोग्य शिबिरांच्या आयोजनापुरते मर्यादित न राहता आरोग्यसेवा, जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य, आजारांचे लवकर निदान, उपचाराचा पाठपुरावा आणि नागरिकांचा सहभाग यांना एकत्र आणणारे व्यापक अभियान म्हणून राबविण्यात येत आहे.


ठाणे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या विविध यंत्रणांच्या समन्वयातून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांना दर्जेदार, सुलभ व तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा केंद्रबिंदू आहे.


ठाणे जिल्ह्यातील सेवा संकल्प अभियानाची ठळक आकडेवारी


ठाणे जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत एकूण १०७ उपक्रम राबविण्यात आले असून, या उपक्रमांमधून १४,७८२ नागरिकांना विविध आरोग्यसेवांचा लाभ मिळाला आहे. यामध्ये १२ आरोग्य तपासणी शिबिरांतून ३,७६० नागरिकांची तपासणी, २ योग व ध्यान सत्रांद्वारे ५९८ नागरिकांना लाभ, महिला आरोग्य व स्वच्छतेच्या ७ उपक्रमांतून १,११० नागरिकांपर्यंत पोहोच, पोषण व अॅनिमिया जनजागृतीच्या ८ उपक्रमांतून १,५५९ नागरिकांना मार्गदर्शन, तसेच २ आयुष्मान भारत कार्ड वाटप उपक्रमांतून ३१३ नागरिकांना लाभ देण्यात आला आहे. याशिवाय किशोरवयीन क्षमता बांधणीच्या ८ उपक्रमांतून ३५६, मानसिक आरोग्य स्क्रीनिंग व समुपदेशनाच्या ७ उपक्रमांतून ७१९, निरोगी जीवनशैली जनजागृतीच्या १२ उपक्रमांतून १,५२६, व्यसनमुक्ती जनजागृती व समुपदेशनाच्या ७ उपक्रमांतून १,१२०, NCD तपासणीच्या ८ उपक्रमांतून २,३४१, तर NCD संबंधित रुग्णांच्या पाठपुराव्याच्या १३ उपक्रमांतून ५२५ नागरिकांना सेवा व मार्गदर्शन मिळाले आहे.

🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏




👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈


👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈


👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈


👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏


 दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं। 


संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं। 


तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏 


🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता 


श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏


🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏


जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏


Comments

Popular posts from this blog

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी)

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना: सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के संपर्क विवरण वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना भारत सरकार की एक महत्वपूर्ण पहल है, जो राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) के तहत लाभार्थियों को देशभर में किसी भी उचित मूल्य की दुकान (FPS) से सब्सिडी वाले अनाज प्राप्त करने की सुविधा प्रदान करती है। यह योजना सभी 36 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू है, जिसमें असम हाल ही में शामिल हुआ है। योजना के तहत राशन कार्ड को आधार से सीड करने की आवश्यकता होती है। योजना से संबंधित शिकायतों, जानकारी या सहायता के लिए राष्ट्रीय स्तर पर टोल फ्री हेल्पलाइन नंबर 14445 उपलब्ध है। इसके अलावा, सामान्य PDS हेल्पलाइन नंबर 1967 है। कुछ राज्यों में अतिरिक्त स्थानीय नंबर भी हैं। नीचे सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्य संपर्क विवरण दिए गए हैं (मुख्यालय का पता, फोन नंबर और ईमेल जहां उपलब्ध)। ये विवरण आधिकारिक स्रोतों से संकलित हैं। यदि आपको मोबाइल नंबर की आवश्यकता है, तो आधार से लिंक्ड रजिस्टर्ड मोबाइल का उपयोग करें, क्योंकि योजना में...

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्रचार (campaign) बंद होण्याची तारीख आणि वेळ: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे (मतदान ७:३० AM ते ५:३० PM पर्यंत).

 भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। 29 महानगरपालिकाओं (जिसमें BNCMC भी शामिल है) के लिए एक ही चरण में चुनाव हो रहे हैं। सामान्य नियमों के अनुसार, प्रचार मतदान शुरू होने से ठीक पहले मतदान के दिन सुबह 7:30 बजे तक बंद हो जाता है (यानी 15 जनवरी 2026 को सुबह 7:30 बजे से प्रचार पूरी तरह प्रतिबंधित)। कुछ स्थानीय निकायों में प्रचार पिछले दिन रात 10 बजे तक बंद होता है, लेकिन महानगरपालिका चुनावों (जैसे BMC, BNCMC आदि) के लिए आधिकारिक रूप से प्रचार समाप्ति मतदान शुरू होने के समय (15 जनवरी सुबह 7:30 बजे) मानी जाती है। मुख्य तिथियाँ (संक्षेप में): नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि: 30 दिसंबर 2025 नामांकन की जांच: 31 दिसंबर 2025 नाम वापसी की अंतिम तिथि: 2 जनवरी 2026 अंतिम उम्मीदवार सूची: 3 जनवरी 2026 मतदान: 15 जनवरी 2026 (7:30 AM से 5:30 PM) मतगणना: 16 जनवरी 2026 प्...

भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल

  भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल भिवंडी, 10 अगस्त 2026: भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिका में काम करने वाले अधिकारियों और कर्मचारियों की ओर से महाराष्ट्र राज्य जाति कर्मचारी कल्याण महासंघ  ने अनिश्चितकालीन हड़ताल का अंतिम नोटिस जारी किया है। महासंघ का कहना है कि पिछले कई वर्षों से लंबित सेवा लाभ और पदोन्नतियां न मिलने के कारण कर्मचारियों का धैर्य अब जवाब दे चुका है। महासंघ के  अध्यक्ष दीपक राव द्वारा जारी पत्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुमित्राअजित पवार समेत राज्य सरकार के वरिष्ठ अधिकारियों तथा भिवंडी महानगरपालिका प्रशासन को चेतावनी दी गई है।  पत्र में कहा गया है कि इस नोटिस की प्राप्ति से 30 दिनों के अंदर सभी लंबित मांगें पूरी नहीं हुईं तो आवश्यक सेवाओं सहित अनिश्चितकालीन हड़ताल की जाएगी। प्रमुख मांगें छठे और सातवें वेतन आयोग के लंबित अंतर (एयरियर्स) एश्योर्ड प्रोग्रेस स्कीम के तहत 12 और 24 वर्ष की सेवा पूरी करने पर म...