पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ कार्यक्रमात शहरातील 146 उमेदवारांना रोजगार प्राप्त….
दिनांक : 29 सप्टेंबर, 2026
पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ कार्यक्रमात शहरातील 146 उमेदवारांना रोजगार प्राप्त….
दिनांक : 29 सप्टेंबर, 2026
महाराष्ट्र शासनाच्या पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ कार्यक्रमांतर्गत आज भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत ईदगाह येथील तकिया अमानी शाह आय टी आय, कामतघर फेणेपाडा येथील तेलगू समाज शिक्षण संस्था व छत्रपती शिवाजी महाराज चौक चाचा नेहरू शाळेतील संस्कार प्रतिष्ठान या तीन ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याकरिता एकूण 600 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यापैकी 379 उमेदवार प्रत्यक्षात उपस्थित होते. यामध्ये चाचा नेहरू शाळेतील संस्कार प्रतिष्ठान येथे 213 उमेदवारांपैकी 178 जणांची प्राथमिक निवड होऊन त्यापैकी 118 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तर तकीया अमानी शाहा आय.टी.आय. येथे 127 उमेदवारांपैकी 28 जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. अशा प्रकारे आज एकूण 379 उमेदवारांपैकी 146 उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
या रोजगार महाकुंभ मेळाव्या मध्ये एकूण 32 कंपन्यांनी सहभाग घेतला होता, ज्यामध्ये दोढिया लि. ट्रायडेंट एच आर प्रा.ली., प्रिकोन मॅन पॉवर, श्री कृपा सर्व्हिस प्रा.ली., एल आय सी, महिंद्रा अँड महिंद्रा, फ्लिपकार्ट, टोरंट पॉवर, हिताची कॅश मॅनेजमेंट या प्रमुख कंपन्या सहभागी झाल्या होत्या.
या मेळाव्यामध्ये समाज कल्याण विभागाचे प्रमुख श्री. मिलींद पळसुले, सहायक आयुक्त प्रभाग समिती क्र. 5 श्री. गिरीष घोष्टेकर व कौशल्य विकास विभागाचे व्ही. आर. पाटील तसेच, संस्कार प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष तसेच मा. सभापती प्रभाग समिती क्र. 5 ॲङ वैभव भोईर, नगरसेवक श्री. सुमीत पाटील, नगरसेवक श्री. निलेश चौधरी, माजी नगरसेवक श्री. हनुमान चौधरी, नगरसेविका श्रीमती रोमा आळशी, नगरसेविका श्रीमती नेहा काठवले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲङ हर्षल पाटील हे उपस्थित होते.
(श्रीकांत परदेशी)
माहिती व जनसंपर्क अधिकारी
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏





Comments