जिल्हा परिषद, ठाणे *जिल्हा परिषद ठाणे व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन उत्साहात साजरा* *“अभियंते हे जगाचे निर्माते; तांत्रिक ज्ञान व कल्पकतेच्या माध्यमातून समाजाच्या जीवनमानात सुधारणा घडवावी” – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव*
जिल्हा परिषद, ठाणे *जिल्हा परिषद ठाणे व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन उत्साहात साजरा* *“अभियंते हे जगाचे निर्माते; तांत्रिक ज्ञान व कल्पकतेच्या माध्यमातून समाजाच्या जीवनमानात सुधारणा घडवावी” – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव* ठाणे, दि. २९ सप्टेंबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिनाचा कार्यक्रम दि. २८ सप्टेंबर, २०२६ रोजी समिती सभागृह, बी. जे. हायस्कूल, ठाणे येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात गुणवंत अभियंता यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पदोन्नती प्राप्त व सेवानिवृत्त अभियंतांना पुरस्कार देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी अभियंत्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “We are the makers of the world.” माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी अभियंते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन अभियंत्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि तांत्रिक ज्ञानाचा वापर करून नवी...