शेतजमिनींच्या पोटहिस्सा मोजणीसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रत्येक पोटहिस्स्याला स्वतंत्र नकाशा व ULPIN क्रमांक
शेतजमिनींच्या पोटहिस्सा मोजणीसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रत्येक पोटहिस्स्याला स्वतंत्र नकाशा व ULPIN क्रमांक मुंबई / पुणे : राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिस्से, ७/१२ अधिकार अभिलेख आणि जमिनीच्या नकाशांमधील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २७ जानेवारी २०२६ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानुसार ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या पोटहिस्स्यांची मोजणी करून नकाशे आणि ७/१२ अधिकार अभिलेख अद्ययावत करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक पोटहिस्स्याला स्वतंत्र नकाशा, अद्ययावत ७/१२ आणि ULPIN (Unique Land Parcel Identification Number – भू-आधार क्रमांक) मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. शासन निर्णयातील मुख्य मुद्दे राज्यातील सर्व सर्वे नंबर आणि गट नंबरमध्ये तयार झालेल्या पोटहिस्स्यांची मोजणी करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्ष जमिनीची मोजणी करून क्षेत्रफळ, सीमा आणि ७/१२ अधिकार अभिलेख यांचा अचूक मेळ घालण्यात येईल. प्रत्येक भूभागाला स्वतंत्र भू-आधार क्रमांक (ULPIN) देण्याचे उद्दिष्ट आहे. ...