श्री कालभैरव जयंती उत्सव : संगीतमय देवी भागवत कथा आयोजित भिवंडी, : श्री कालभैरव मंदिर, ब्रह्मण आळी येथे यंदाही २६ व्या वर्षी श्री कालभैरव जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. या निमित्ताने संगीतमय श्री देवी भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे. कथा प्रवक्त्या म्हणून भाषाप्रभु समर्थ सद्गुरु रामचंद्र महाराज यांच्या शिष्या साध्वी सर्वेश्वरी गुरुदासी (शिवालय आश्रम, ता. नांदुरा, जि. बुलडाणा) उपस्थित राहणार आहेत. कथा २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत दररोज दुपारी ४.३० वाजता सुरू होऊन सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत चालेल. उत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालयोगी श्री सदानंद महाराज (तुंगारेश्वर पर्वत, वसई) यांच्या शुभहस्ते ग्रंथ पूजन व दीप पूजन होणार आहे. तसेच सकाळी ९ वाजता पालखी सोहळा (नगर प्रदक्षिणा) काढण्यात येईल. दररोज सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत लघुरुद्र अभिषेक आणि ११.३० ते ३ वाजेपर्यंत 🙏 भंडारा (महाप्रसाद) आयोजित करण्यात आला आहे. 🙏 श्री कालभैरव मंदिर सेवा समितीने सर्व भाविकांना कथा श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ठिकाण : श्री क...