जिल्हा परिषद, ठाणे *नूतन हिंदी विद्यालयात विद्यार्थ्यांनी दिला ‘नो ड्रग्स’चा नारा* *सेवा संकल्प अभियान तसेच ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत १७५ विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प*
जिल्हा परिषद, ठाणे *नूतन हिंदी विद्यालयात विद्यार्थ्यांनी दिला ‘नो ड्रग्स’चा नारा* *सेवा संकल्प अभियान तसेच ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत १७५ विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प* ठाणे, दि. १४ ऑक्टोबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : सेवा संकल्प अभियान तसेच नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद, ठाणे समाजकल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील कोळसेवाडी परिसरातील नूतन हिंदी विद्यालयात येथे दि. १३ ऑक्टोबर, २०२६ रोजी अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद, ठाणे समाजकल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात १७५ विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याचे ठाणे जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी ‘अंमली पदार्थांना नाही म्हणा आणि जीवनाला हो म्हणा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवकांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करणे, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणे आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा ...