जिल्हा परिषद, ठाणे *नूतन हिंदी विद्यालयात विद्यार्थ्यांनी दिला ‘नो ड्रग्स’चा नारा* *सेवा संकल्प अभियान तसेच ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत १७५ विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प*
जिल्हा परिषद, ठाणे
*नूतन हिंदी विद्यालयात विद्यार्थ्यांनी दिला ‘नो ड्रग्स’चा नारा*
*सेवा संकल्प अभियान तसेच ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत १७५ विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प*
ठाणे, दि. १४ ऑक्टोबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : सेवा संकल्प अभियान तसेच नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद, ठाणे समाजकल्याण विभाग आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील कोळसेवाडी परिसरातील नूतन हिंदी विद्यालयात येथे दि. १३ ऑक्टोबर, २०२६ रोजी अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद, ठाणे समाजकल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात १७५ विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारत घडविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याचे ठाणे जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी ‘अंमली पदार्थांना नाही म्हणा आणि जीवनाला हो म्हणा’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. युवकांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करणे, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती देणे आणि व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
मार्गदर्शन करताना मिलिंद पाटील यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचा व्यक्तीच्या आरोग्यावर तसेच समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली. तंबाखूच्या सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. तसेच युवकांमध्ये व्यसनाधीनता निर्माण झाल्यास त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासोबतच शिक्षणावर आणि भविष्यातील प्रगतीवरही प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, व्यसनांच्या प्रलोभनांना बळी पडू नये आणि आपल्या मित्रपरिवारातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच परिसरात अंमली पदार्थांची विक्री किंवा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी सतर्क राहून संबंधित यंत्रणांना सहकार्य करावे, असे सांगत या राष्ट्रीय कार्यात प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.
नूतन हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुप्रिता पटवर्धन यांनी आपल्या मार्गदर्शनातून अंमली पदार्थविरोधी जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली. व्यसनांविरोधात सकारात्मक वातावरण निर्माण करणे, युवकांना योग्य दिशा देणे आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
‘व्यसन सोडा, माणसे जोडा’ आणि ‘जीवन खूप सुंदर आहे’ या संदेशातून त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि स्वतःसह समाजाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. व्यसनमुक्त जीवनशैलीमुळे व्यक्तीचे आरोग्य, शिक्षण आणि भवितव्य अधिक सक्षम होऊ शकते, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला नूतन हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुप्रिता पटवर्धन, शिक्षिका अन्नू पांडे, श्री. अक्षत तिवारी तसेच विद्यालयातील १७५ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांचे सेवन न करण्याचा, व्यसनांपासून दूर राहण्याचा आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाची सांगता अंमली पदार्थविरोधी शपथ घेऊन करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करून त्यांना निरोगी, सुरक्षित आणि व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏

Comments