Skip to main content

Posts

मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात संपन्न* *इयत्ता चौथी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद ठाणेचा उपक्रम*

जिल्हा परिषद, ठाणे *‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात संपन्न* *इयत्ता चौथी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद ठाणेचा उपक्रम* ठाणे, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करून देणे आणि परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे आणि open Link foundation यांच्या तांत्रिक सहकार्याने ‘मिशन भरारी – शिष्यवृत्ती सराव चाचणी’ दि. ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील केंद्रस्तरावर घेण्यात आली. ‘मिशन भरारी – शिष्यवृत्ती सराव चाचणी’साठी जिल्ह्यातील इयत्ता चौथी, सातवी व आठवी (NMMS) मिळून एकूण १०,०६६ विद्यार्थी उपस्थित राहिले.  या सराव चाचणीमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी आपल्या तयारीचे मूल्यमापन करण्याची, परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करण्याची तसेच ज्या विषयांमध्ये अधिक सरावाची आवश्यकता आहे, त्या बाबी ओळखण्याची संध...

पंचायत समिती कल्याण येथे ‘जल सुरक्षा अभियान’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद ८० हून अधिक जल सुरक्षा रक्षक यांचा सहभाग; पाणी गुणवत्ता व जलसुरक्षेबाबत जनजागृतीवर भर

जिल्हा परिषद, ठाणे *पंचायत समिती कल्याण येथे ‘जल सुरक्षा अभियान’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद* *८० हून अधिक जल सुरक्षा रक्षक यांचा सहभाग; पाणी गुणवत्ता व जलसुरक्षेबाबत जनजागृतीवर भर* ठाणे, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : पाणी गुणवत्ता, जलस्रोतांचे संरक्षण आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने पंचायत समिती कल्याण येथे ‘जल सुरक्षा अभियान’ अंतर्गत दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशन पंडित राठोड यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. INREM Foundation यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेला ८० हून अधिक सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद,ठाणे स्वच्छ भारत मिशन व INREM Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस जिल्हा परिषद ठाणेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड, INREM Foundation चे कार्यकारी संचालक डॉ. सुंदरराजन कृष्णन, पंचायत समिती कल्याणचे गट...

ज्येष्ठ अभिनेते, नटसम्राट नाना पाटेकर यांच्या निधनाने व्यक्तिगत हानी* *महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान हरपला* *शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नानांचे काम कायम स्मरणात* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे* नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली*

 *ज्येष्ठ अभिनेते, नटसम्राट नाना पाटेकर यांच्या निधनाने व्यक्तिगत हानी* *महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान हरपला* *शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नानांचे काम कायम स्मरणात* *-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे* नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली* मुंबई, दि. 8 अक्टूबर 2026 : रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. गेल्याच आठवड्यात अनंत चतुर्थीच्या दिवशी नानांच्या पुण्याच्या घरी गणपती दर्शनाच्या वेळेस झालेली भेट ही शेवटची ठरली, अशी शोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करताना नानांच्या आठवणींना उजाळा दिला. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणाले, नाना पाटेकर हे अभिनयाची ...

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली*

 *नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली* मुंबई, दि. 8 अक्टूबर 2026 :- भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्याआड गेला आहे. नटसम्राट नानांची अशी आकस्मिक एक्झिट धक्कादायक आहे, अशी शोकमग्न भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर यांनी घेतलेली भूमिका कलाक्षेत्रासह, अनेकांना सामाजिक बांधिलकीचा धडा घालून देणारी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे कला आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, स्नेही, मित्र म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे घट्ट ऋणानुबंध राहीले आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीला नानांच्या रुपाने मराठी मातीतील रांगडा, पण तितकाच संवेदनशील असा अभिनेता मिळ...

नाना पाटेकर का निधन: गोवा स्थित आवास पर कार्डियक अरेस्ट से गुजर गए महान अभिनेता

 नाना पाटेकर का निधन: गोवा स्थित आवास पर कार्डियक अरेस्ट से गुजर गए महान अभिनेता गोवा/मुंबई, 8 अक्टूबर 2026: हिंदी और मराठी सिनेमा के दिग्गज अभिनेता नाना पाटेकर का आज सुबह गोवा स्थित अपने आवास पर निधन हो गया। वे 75 वर्ष के थे। परिवार और अस्पताल सूत्रों के अनुसार, नाना पाटेकर को आज सुबह गंभीर कार्डियक अरेस्ट आया। उन्हें तुरंत चिकित्सकीय सहायता दी गई और लगभग 45 मिनट तक सीपीआर (कार्डियो-पल्मोनरी रिससिटेशन) का प्रयास किया गया, लेकिन उन्हें बचाया नहीं जा सका। मणिपाल हॉस्पिटल, गोवा के डॉक्टरों ने सुबह लगभग 5:20 बजे उन्हें मृत घोषित कर दिया। उनके बेटे मल्हार पाटेकर ने इस दुखद खबर की पुष्टि की है। नाना पाटेकर गोवा के दोना पौला इलाके में अपने आवास पर थे। नाना पाटेकर (जन्म: 1 जनवरी 1951) ने करीब पांच दशकों तक हिंदी और मराठी सिनेमा में अविस्मरणीय भूमिकाएं निभाईं। ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘अग्नि साक्षी’, ‘नटसम्राट’ और ‘वेलकम’ जैसी फिल्मों में उनके शक्तिशाली अभिनय ने उन्हें तीन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार दिलाए। वे अपनी तीव्रता, अलग अंदाज और संवाद अदायगी के लिए पूरे देश में जाने जाते थे। प्रधानमंत्...

प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मराठी भाषा विकास कक्ष';* *मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसी*

 *प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार 'मराठी भाषा विकास कक्ष';* *मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसी* ठाणे,दि.7 अक्टूबर 2026:- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आता स्वतंत्र 'मराठी भाषा विकास कक्ष' सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिले.      राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मराठी भाषा अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.       या बैठकीस मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.       यावेळी मराठी भाषा मंत्री डॉ. सामंत म्हणाले, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा त्याच्या परिसरात मराठी भाषा विकास कक्ष सुरू केला जाईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने ५०० ते ६०० चौरस फ...

वाशीत रंगणार औद्योगिक तंत्रज्ञानाचा महाकुंभ;* *'बॉइलर इंडिया २०२६' आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे ८ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन!*

 *वाशीत रंगणार औद्योगिक तंत्रज्ञानाचा महाकुंभ;* *'बॉइलर इंडिया २०२६' आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे ८ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन!* ठाणे, दि.7 अक्टूबर 2026 : उद्योग जगतातील अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित मानला जाणारा ‘बॉइलर इंडिया २०२६’ (Boiler India 2026) हा तीन दिवसीय भव्य आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, चर्चासत्र व प्रदर्शन सोहळा ८ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.          महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग आणि बाष्पके संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने बाष्पकांचा सुरक्षित व कार्यक्षम वापर, हिट एक्सचेंजर्स, प्रेशर वेसल्स निर्मितीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयांवर आधारित हा भव्य उपक्रम साकारला जात आहे.      या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता सिडको प्रदर्शन केंद्रात संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ...