मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात संपन्न* *इयत्ता चौथी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद ठाणेचा उपक्रम*
जिल्हा परिषद, ठाणे
*‘मिशन भरारी’ अंतर्गत शिष्यवृत्ती सराव चाचणी उत्साहात संपन्न*
*इयत्ता चौथी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद ठाणेचा उपक्रम*
ठाणे, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करून देणे आणि परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे आणि open Link foundation यांच्या तांत्रिक सहकार्याने ‘मिशन भरारी – शिष्यवृत्ती सराव चाचणी’ दि. ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील केंद्रस्तरावर घेण्यात आली. ‘मिशन भरारी – शिष्यवृत्ती सराव चाचणी’साठी जिल्ह्यातील इयत्ता चौथी, सातवी व आठवी (NMMS) मिळून एकूण १०,०६६ विद्यार्थी उपस्थित राहिले.
या सराव चाचणीमुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी आपल्या तयारीचे मूल्यमापन करण्याची, परीक्षेच्या स्वरूपाचा सराव करण्याची तसेच ज्या विषयांमध्ये अधिक सरावाची आवश्यकता आहे, त्या बाबी ओळखण्याची संधी उपलब्ध झाली.
‘मिशन भरारी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याची क्षमता विकसित करणे, नियमित सरावाची सवय लावणे आणि शिष्यवृत्ती परीक्षेत अधिकाधिक विद्यार्थी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे, यावर भर देण्यात येत आहे. सराव चाचणीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वातावरणाचा अनुभव मिळून आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांच्या नियोजनातून ‘मिशन भरारी – शिष्यवृत्ती सराव चाचणी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यातील संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक आणि संबंधित यंत्रणांनी या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य केले.
या उपक्रमाला पालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आपल्या मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वातावरणात सरावाची संधी मिळाल्याने तसेच त्यांच्या तयारीचे मूल्यमापन करता आल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी अशा प्रकारचे नियमित सराव उपक्रम राबविणे उपयुक्त ठरत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देणे, हा ‘मिशन भरारी’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या नियमित सरावातून त्यांची शैक्षणिक क्षमता अधिक बळकट होऊन शिष्यवृत्ती परीक्षेतील सहभाग आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏




Comments