पंचायत समिती कल्याण येथे ‘जल सुरक्षा अभियान’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद ८० हून अधिक जल सुरक्षा रक्षक यांचा सहभाग; पाणी गुणवत्ता व जलसुरक्षेबाबत जनजागृतीवर भर
जिल्हा परिषद, ठाणे
*पंचायत समिती कल्याण येथे ‘जल सुरक्षा अभियान’ कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*८० हून अधिक जल सुरक्षा रक्षक यांचा सहभाग; पाणी गुणवत्ता व जलसुरक्षेबाबत जनजागृतीवर भर*
ठाणे, दि. ०८ ऑक्टोबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : पाणी गुणवत्ता, जलस्रोतांचे संरक्षण आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने पंचायत समिती कल्याण येथे ‘जल सुरक्षा अभियान’ अंतर्गत दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशन पंडित राठोड यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. INREM Foundation यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत आयोजित कार्यशाळेला ८० हून अधिक सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद,ठाणे स्वच्छ भारत मिशन व INREM Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेस जिल्हा परिषद ठाणेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक पंडित राठोड, INREM Foundation चे कार्यकारी संचालक डॉ. सुंदरराजन कृष्णन, पंचायत समिती कल्याणचे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रारूपकार महेश वाळुंज, जिल्हा परिषद ठाणेच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सुजाता पाटील, आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक रमेश सांबरे तसेच UNICEF चे राज्य WASH सल्लागार संदीप तेंडोलकर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील जलक्षेत्रात कार्यरत WOTR, ACWADAM, UNICEF आणि SATTVA या विकास भागीदार संस्थांचे प्रतिनिधी तसेच जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनचे जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा परिषद ठाणेचे अधिकारी-कर्मचारी आणि पंचायत समिती कल्याण स्तरावरील अधिकारी यांचीही कार्यशाळेत सक्रिय उपस्थिती होती.
कार्यशाळेचे नेतृत्व INREM Foundationच्या Programme Lead नेहा पवार यांनी केले, तर INREM Foundationच्या Consultant नम्रता गोडांबे यांनी कार्यक्रमाचे समन्वय व सूत्रसंचालन केले. INREM Foundationच्या मध्य प्रदेश व गुजरात येथील पथकातील सदस्यांनीही कार्यशाळेत सहभागी होऊन विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत ‘जल सुरक्षा अभियान’ची संकल्पना, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात आली. तसेच bpच्या जलक्षेत्रातील उपक्रमांचा आढावा सादर करण्यात आला. ठाणे जिल्हा परिषद व WSSOच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील स्थानिक जलसमस्या, पाणी गुणवत्ता, जलस्रोतांचे संरक्षण आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी विविध गावांमध्ये जलसुरक्षा विषयावर काम करणाऱ्या ‘जल सुरक्षाकां’नी त्यांच्या गावांतील पाणी गुणवत्ता व जलस्रोतांशी संबंधित अनुभव सहभागींसमोर मांडले. स्थानिक पातळीवरील पाणीविषयक समस्या, त्यावरील उपाययोजना आणि जलसुरक्षेसाठी समुदायाच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व यावर चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेच्या समारोपावेळी ‘जल सुरक्षा अभियान’च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले. उपस्थित सहभागींची अभियानाच्या पुढील उपक्रमांसाठी नोंदणी व ऑनबोर्डिंग करण्यात आले.
पाणी गुणवत्ता सुधारणा, जलस्रोतांचे संरक्षण, स्थानिक जलसमस्यांवरील उपाययोजना आणि समुदायाचा सक्रिय सहभाग यांना चालना देणाऱ्या या कार्यशाळेमुळे ठाणे जिल्ह्यात जलसुरक्षेबाबतच्या सामूहिक प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏


Comments