*भिवंडीमध्ये प्रतिबंधित मांगूर मासळी विक्री प्रकरण: १७५ किलो मासळी जप्त, विक्रेत्यावर FIR दाखल* ठाणे जिल्ह्यातीaल भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका हद्दीत प्रतिबंधित मांगूर मासळीची विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय मांगूर निर्मूलन समितीने दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी भिवंडी शहरातील कोंडाजीवाडी येथील इम्रान फिश शॉप (मालक: श्री. इम्रान नजीर कुरेशी) येथे धाड टाकली. प्रथमत: दुकानातील रोहू, पंगेशियस व रुपचंद मासळीमध्ये फक्त २ नग (एकूण ४.५ किलो) प्रतिबंधित मागूर मासळी आढळली. परंतु स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुकानासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप ट्रक (क्र. MH 04 HS १२६६) ची तपासणी केली असता, त्यातील ८ निळ्या ड्रमपैकी ३ ड्रममध्ये एकूण १७१ किलो मांगूर मासळी आढळली. दुकान व ट्रकमधील मिळून एकूण १७५ किलो प्रतिबंधित मांगूर मासळी समितीद्वारे जप्त करण्यात आली. सदर मासळी भिवंडी शहरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्र, रामनगर चावींद्रा येथे शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आली. संबंधित मासेविक्रेते श्री. इम्रान नजीर कुरेशी यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस स्टेशनमध्य...