*भिवंडीमध्ये प्रतिबंधित मांगूर मासळी विक्री प्रकरण: १७५ किलो मासळी जप्त, विक्रेत्यावर FIR दाखल*
ठाणे जिल्ह्यातीaल भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका हद्दीत प्रतिबंधित मांगूर मासळीची विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हास्तरीय मांगूर निर्मूलन समितीने दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी भिवंडी शहरातील कोंडाजीवाडी येथील इम्रान फिश शॉप (मालक: श्री. इम्रान नजीर कुरेशी) येथे धाड टाकली.
प्रथमत: दुकानातील रोहू, पंगेशियस व रुपचंद मासळीमध्ये फक्त २ नग (एकूण ४.५ किलो) प्रतिबंधित मागूर मासळी आढळली. परंतु स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुकानासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा बोलेरो पिकअप ट्रक (क्र. MH 04 HS १२६६) ची तपासणी केली असता, त्यातील ८ निळ्या ड्रमपैकी ३ ड्रममध्ये एकूण १७१ किलो मांगूर मासळी आढळली.
दुकान व ट्रकमधील मिळून एकूण १७५ किलो प्रतिबंधित मांगूर मासळी समितीद्वारे जप्त करण्यात आली. सदर मासळी भिवंडी शहरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्र, रामनगर चावींद्रा येथे शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आली.
संबंधित मासेविक्रेते श्री. इम्रान नजीर कुरेशी यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आला असून, पिकअप ट्रकच्या मालकीबाबत स्थानिक पोलीस प्रशासन पुढील तपास करित आहे.
सदर कारवाई हि जिल्हास्तरिय मांगूर निर्मूलन समितीच्या मत्स्यव्यवसाय विभाग, ठाणे -पालघर, भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिका तसेच शांतीनगर भिवंडी पोलीस स्टेशन यांच्याद्वारे करण्यात आली.
(स्नेहल पुण्यार्थी)
विभाग प्रमुख
बाजार, परवाना विभाग
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏
















Comments