नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई मे. पी. के. डेअरीतील दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश ४,७१० लिटर दुधासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
*नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई* *मे. पी. के. डेअरीतील दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश,* *४,७१० लिटर दुधासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त* *ठाणे,दि.24 दिनांक :- 24/08/2026 * : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पर्दाफाश केला आहे. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार, दक्षता विभागाच्या सह-आयुक्त श्रीमती प्रीती टिपरे आणि ठाण्याचे अन्न सह-आयुक्त श्री. सचिन जाधव यांच्या निर्देशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. १९ ऑगस्ट २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणे एफडीएच्या पथकाने महापे येथील मे. पी. के. डेअरीवर अचानक छापा टाकला. भेसळीची धक्कादायक पद्धत आणि रंगेहाथ कारवाई छाप्यादरम्यान मे. पी. के. डेअरीच्या आवारात 'एमएच ०४ केयू १६३४' क्रमांकाचा आयशर दूध टँकर उभा असल्याचे आढळले. डेअरी मालक प्रदीप कमलेश यादव याच्या संगनमताने शिवेंद्र श्यामलाल जैस्वाल (वय ३४) हा दुधाची पाकिटे फोडून त्यामध्ये स्किम्ड मिल्क पावडर (SMP) आणि चिलर...