राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन *अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे*
*राज्य महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन*
*अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे*
ठाणे,दि.24 अगस्त 2026:- शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026' आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी या स्पर्धेचा विस्तार राज्यस्तरासोबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेला असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विविध स्तरांवर पारितोषिके जिंकण्याची संधी उपलब्ध आहे.
स्पर्धेचे अर्ज अकादमीच्या संकेतस्थळावर https://ganeshotsav.pldmka.co.in या ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वीकारण्यात येणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार, दि.7 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा नियेाजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी केले आहे.
या महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरावर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाईन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत. स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 असून ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
विजेत्या मंडळांना जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या https://ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल.
याकरिता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे प्रसिद्ध करावीत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी केले आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏

Comments
Post a Comment