भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार श्री. मदन गजानन शेलार यांना “कोंकण विभागातील आदर्श नायब तहसीलदार” हा सर्वोच्च सन्मान पुरस्कार मिळाला आहे.
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार श्री. मदन गजानन शेलार यांना “कोंकण विभागातील आदर्श नायब तहसीलदार” हा सर्वोच्च सन्मान पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, प्रांत अधिकारी अमित सानप व तहसीलदार खोले यांनी शेलार यांचे अभिनंदन केले. भिवंडी तालुका तलाठी संघटनेनेही त्यांचा गौरव केला. शेलार यांचा प्रवास तलाठी पदापासून नायब तहसीलदार पदापर्यंत कष्टातून घडलेला आहे. जव्हार, मोखाडा, वाडा व भिवंडी येथे तलाठी मंडळ अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त व वक्तशीरपणा यांचा आदर्श घालून दिला. नैसर्गिक आपत्ती, निवडणुकीचे कामकाज किंवा महसूली कामकाज असो, नागरिकांच्या हितासाठी ते नेहमी तत्पर राहिले. मुळचे वांगणीचे भूमिपुत्र असलेले शेलार गोर-गरीबांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी व शेतकरी यांच्या हितासाठी त्यांनी विशेष काम केले आहे. “अगोदर काम, नंतर संसार” हे त्यांचे सूत्र असून कामात निटनेटकेपणा, शिस्त व अभ्यासू वृत्ती ही त्यांची ख...