आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण
जिल्हा परिषद, ठाणे
*आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण*
ठाणे, दिनांक : ४ ऑगस्ट, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (पुरुष) या पदावरील ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती देऊन समुपदेशनानंतर पदस्थापना आदेशांचे वितरण आज, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, "अधिक जबाबदारीने सेवा करण्याची संधी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर आणि संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकाने आपल्या नव्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम बनविण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे."
पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त करत जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले. नव्या जबाबदारीचे भान ठेवून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏



Comments
Post a Comment