मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र
दि. ०६ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी गणना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ ऑगस्ट; प्रारूप यादी २४ ऑगस्टला प्रसिद्ध
मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणात (Special Intensive Revision) भाग घेणाऱ्या मतदारांनी १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रकानुसार हा कार्यक्रम चालू आहे.
गणना अर्ज भरून स्वाक्षरी करून दिलेल्या मतदारांची नावे २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होतील. ही प्रारूप यादी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात तसेच भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम १७ व १८ नुसार कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवता येत नाही. त्यामुळे ज्या मतदारांची नावे सध्या एकापेक्षा अधिक ठिकाणी आहेत, त्यांनी फक्त सध्याच्या राहत्या ठिकाणाचाच गणना अर्ज भरावा. दुसऱ्या ठिकाणच्या अर्जावर ‘Already Enrolled’ असे नमूद करून ते नाव समाविष्ट केले जाणार नाही.
ज्या पात्र मतदारांची नावे २४ ऑगस्टच्या प्रारूप यादीत दिसणार नाहीत किंवा जे नवीन मतदार आहेत, त्यांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रांसह) भरून नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहील. याच एक महिन्याच्या दावे व हरकतीच्या कालावधीत नोंदीत दुरुस्तीसाठी नमुना ८ आणि कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरता येईल.
चुकीची घोषणा किंवा विधान केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार एक वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही लागू होऊ शकतात.
अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतरही कलम २२ व २३ नुसार निरंतर अद्यतन प्रक्रियेद्वारे नाव समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती करता येईल. पात्र व्यक्ती नमुना ६ द्वारे अर्ज करू शकतात.
सर्व नागरिकांनी मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी वेळेवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏

Comments
Post a Comment