अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई* *भिवंडीसह कोकण विभागात 12 कोटींहून अधिक किमतीचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त*
*अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई*
*भिवंडीसह कोकण विभागात 12 कोटींहून अधिक किमतीचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त*
*ठाणे, दिनांक :- 02/11/2026* :- दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची सुरक्षा आणि अन्नपदार्थांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) गुप्तवार्ता दक्षता विभागाने धडक कारवाई मोहीम राबवली आहे. सह आयुक्त श्रीमती प्रिती टिपरे (दक्षता) आणि सह आयुक्त सचिन जाधव (कोकण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत या आठवड्यात एकूण १२,४२,८७,१५३ रुपयांचा संशयास्पद आणि मिथ्याछाप अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
भिवंडी येथील डीमार्ट (ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड) मध्ये २९ ऑक्टोबर २०२६ रोजी टाकलेल्या छाप्यामध्ये १,३१,२११ किलो वजनाचे आणि ४,०६,६४,४८४ रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले. हे खाद्यतेल मिसब्रँडेड लेबल दोष आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय आहे. याशिवाय, 27 ऑक्टोबर रोजी भिवंडीतीलच अंबीया ट्रेडर्सवरही कारवाई करण्यात आली; तिथे जुन्या डब्यांचा वापर करून अस्वच्छ जागेत खाद्यतेलाचे पॅकिंग केले जात असल्याने ९८३ किलो वजनाचा आणि १,८२,६७८ रुपये किमतीचा साठा जप्त करून अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.
भिवंडीप्रमाणेच कोकणातील इतर भागांतही अशाच प्रकारच्या मोठ्या कारवाई करण्यात आल्या आहेत. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रायगडमधील पनवेल येथील 'M/s. Ajfan International Retails LLP' वर कारवाई करून मोठ्या प्रमाणावर इम्पोर्टेड चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स आणि एनर्जी ड्रिंक्स जप्त करण्यात आले, ज्यांची किंमत ४,२१,०६,९६१ रुपये होती. याच दिवशी तुर्भे, नवी मुंबई येथील 'मे. सावला फूड्स अँड कोल्ड स्टोरेज प्रा. लि.' वर धडक देऊन एकूण ९१,३५३ किलो वजनाचा ४,१३,३३,०३० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये जर्दाळू, अंजीर, बेदाणे, काळी मिरी, खजूर यांसारख्या पदार्थांचा समावेश होता; ज्यामध्ये लेबलदोष असण्यासोबतच २६ प्रकारचे तब्बल १,६२,९८,६८० रुपये किमतीचे मुदतबाह्य (एक्सपायर्ड) अन्नपदार्थही आढळून आले.
गुप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी यू. एस. बडे, माणिक जाधव आणि डॉ. गजानन साबळे यांनी ही माहिती गोळा केली होती. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि त्यांतर्गत नियम २०११ च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी या सर्व कारवाया करण्यात आल्या आहेत.
नागरिकांना सणासुदीच्या काळात सुरक्षित अन्न मिळावे यासाठी प्रशासनाकडून ही विशेष तपासणी मोहीम अशीच कठोरपणे सुरू राहणार आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏




Comments