Skip to main content

बॉयलर क्षेत्रातील तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध* *‘बॉयलर इंडिया’च्या माध्यमातून उद्योगांना नवे व्यासपीठ* *- कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर*

*बॉयलर क्षेत्रातील तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि सुरक्षिततेला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध*


 *‘बॉयलर इंडिया’च्या माध्यमातून उद्योगांना नवे व्यासपीठ*

                                                                                         

  *- कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर*



 *ठाणे, दिनांक :- 08/10/2026*:- बॉयलर उद्योगातील सुरक्षितता, आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योगस्नेही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, ‘बॉयलर इंडिया 2026 च्या माध्यमातून या क्षेत्रातील उत्पादक, उद्योजक, तज्ज्ञ, अभियंते, ऑपरेटर आणि ग्राहकांना एकत्र आणून तंत्रज्ञान व ज्ञानाच्या देवाणघेवाणीला चालना देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले.

               वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात कामगार विभाग बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित ‘बॉयलर इंडिया 2026’कार्यशाळा, चर्चासत्र व प्रदर्शनाचे उद्घाटन मंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.    

               यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती आय.ए. कुंदन, विकास आयुक्त (असंघटीत कामगार) सुशिल खोडवेकर, केंद्रीय बाष्पके मंडळाचे सचिव तथा तांत्रिक सल्लागार (बाष्पके) संदीप कुंभार, बाष्पके संचालनालयाचे संचालक संदीप चिवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

                कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर म्हणाले, ऊर्जा निर्मिती, साखर उद्योग, वस्त्रोद्योग, रसायने, पेट्रोकेमिकल्स, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती, कागद उद्योग,रिफायनरीज यांसह विविध उद्योगांमध्ये बॉयलर हा उत्पादन प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे बॉयलरची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता यांचा थेट संबंध उद्योगाची उत्पादकता, कामगारांची सुरक्षितता, ऊर्जेचा कार्यक्षम वापर, पर्यावरण आणि देशाच्या औद्योगिक स्पर्धात्मकतेशी असल्याचे ते म्हणाले. 

                 शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स आणि नागरिक केंद्री सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. या उपक्रमात बॉयलर संचालनालयाने राज्यातील 68 विभागांमध्ये चौथा क्रमांक प्राप्त केला, याबद्दल त्यांनी संचालनालयाचे अभिनंदन केले. बॉयलर क्षेत्रातील तपासणी, मान्यता, लेखापरीक्षण आदी प्रक्रियांमध्ये अधिक सुलभता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

                कृत्रिम बुद्धिमत्ता ही आता भविष्यातील बाब राहिलेली नसून आजच्या उद्योगाची गरज बनली आहे. बॉयलर क्षेत्रात बिघाड झाल्यानंतर सूचना देण्याऐवजी बिघाड होण्याची शक्यता आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील का, यावर तज्ज्ञांनी आणि उद्योग क्षेत्राने गांभीर्याने विचार करावा. ‘बॉयलर इंडिया 2026’च्या माध्यमातून अशा आधुनिक तंत्रज्ञानावर, नव्या संकल्पनांवर आणि औद्योगिक सुरक्षिततेवरील उपायांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

                बॉयलर उद्योगाच्या भविष्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. उच्च दाब वेल्डिंग, बॉयलर निर्मिती, तपासणी, विनाशरहित चाचणी, देखभाल, स्वयंचलन आणि प्रगत बॉयलर संचालन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी नागपूर येथे कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत असून, त्याचे रूपांतर बॉयलर कौशल्य, वेल्डिंग, तपासणी आणि औद्योगिक सुरक्षिततेसाठी उत्कृष्टता केंद्र म्हणून करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य प्रमाणपत्रासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

               बॉयलर क्षेत्रात उच्च दाब, उच्च तापमान आणि गुंतागुंतीच्या औद्योगिक प्रक्रिया यांचा समावेश असल्याने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. कामगारांमुळे उद्योग उभे आहेत आणि उद्योगांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास साधला जात आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षितता ही उद्योगांची मूलभूत जबाबदारी आहे. ‘सेफ्टी फर्स्ट’ ही केवळ घोषणा न राहता ती प्रत्येक उद्योगातील प्रत्यक्ष कार्यपद्धती झाली पाहिजे.    

                 बॉयलर इंडिया 2026 च्या माध्यमातून सहभागी उद्योजक, उत्पादक, अभियंते, तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानासोबत नवीन कौशल्य आत्मसात करून ते उद्योगाच्या सुरक्षितता आणि उत्पादकतेसाठी वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.

                                               *बॉयलर निर्मितीपासून तपासणीपर्यंत ‘सेफ्टी फर्स्ट’ आवश्यक*

                                                                                                            *- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे*

             वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले, बॉयलर निर्मितीमध्ये प्लेट रोलिंग, डिसिंग, ट्यूब शीट, ट्यूब्स, वेल्डिंग, विविध चाचण्या, हायड्रो टेस्टिंग आणि शेल टेस्टिंग अशा अनेक प्रक्रिया असतात. या प्रत्येक प्रक्रियेत निर्धारित तांत्रिक मानके आणि सुरक्षितता निकषांचे काटेकोर पालन आवश्यक आहे. ‘बॉयलर इंडिया’मुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणता येत असून, या प्रदर्शनातून उद्योग क्षेत्राला व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

                कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती कुंदन यांनी ‘बॉयलर इंडिया 2026’च्या आयोजनाचे कौतुक करत बॉयलर हे औद्योगिक क्षेत्राचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून त्याबाबत अधिक व्यापक जनजागृती आणि माहितीची देवाणघेवाण आवश्यक आहे, असे सांगितले. ‘बॉयलर इंडिया’चे हे चौथे आयोजन असून यंदाच्या प्रदर्शनात देश-विदेशातील सुमारे २४६ प्रदर्शकांनी सहभाग घेतला आहे. बॉयलरची भूमिका केवळ उष्णता निर्मितीपुरती मर्यादित राहिलेली नसून ऊर्जा कार्यक्षमता, कार्बन उत्सर्जनात घट आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापरातही बॉयलर महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.













                  संदीप कुंभार यांनी बॉयलर क्षेत्रातील केंद्र शासनाच्या सुधारणा आणि नव्या नियामक व्यवस्थेची माहिती देत उत्पादक, वापरकर्ते, दुरुस्तीदार, फॅब्रिकेटर्स आणि अभियंते यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी, यासाठी ‘बॉयलर इंडिया’हे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत असल्याचे ते म्हणाले.  

प्रदर्शनातील स्टॉलची पाहणी

              यावेळी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध उत्पादकांनी मांडलेले बॉयलर, आधुनिक उपकरणे, तंत्रज्ञान व सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली तसेच संबंधित प्रतिनिधींशी संवाद साधला.

                 यावेळी बॉयलरच्या विविध तंत्रज्ञानावर प्रकाश टाकणारा लघुचित्रपट दाखविण्यात आला. प्रदर्शनात विविध प्रकारचे बॉयलर, आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा उपकरणे आणि संबंधित सेवांची माहिती देण्यात आली. बॉयलर क्षेत्रातील तंत्रज्ञान, सुरक्षितता, नियम व कार्यपद्धती याबाबतच्या माहितीपूर्ण पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

               कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्तावित बाष्पके संचालनालयाचे संचालक संदीप चिवटे यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसंचालक ए.एम झुंजुरे यांनी केले. 

              यावेळी विविध राज्यांतील अधिकारी, बॉयलर क्षेत्रातील तज्ज्ञ, अभियंते, उत्पादक, औद्योगिक प्रतिनिधी,ऑपरेटर आणि प्रदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                                                   

🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏

       “सूत्रों के अनुसार…”🪶🙏  

👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈

👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈

👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈

👉 दया की सोच👈  🙏जनहित के लिए🙏   नोट........ 👉👇🙏

 दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं। 

संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं। 

तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏 

🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता 

श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏

🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏

जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏


Comments

Popular posts from this blog

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी)

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना: सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के संपर्क विवरण वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना भारत सरकार की एक महत्वपूर्ण पहल है, जो राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) के तहत लाभार्थियों को देशभर में किसी भी उचित मूल्य की दुकान (FPS) से सब्सिडी वाले अनाज प्राप्त करने की सुविधा प्रदान करती है। यह योजना सभी 36 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू है, जिसमें असम हाल ही में शामिल हुआ है। योजना के तहत राशन कार्ड को आधार से सीड करने की आवश्यकता होती है। योजना से संबंधित शिकायतों, जानकारी या सहायता के लिए राष्ट्रीय स्तर पर टोल फ्री हेल्पलाइन नंबर 14445 उपलब्ध है। इसके अलावा, सामान्य PDS हेल्पलाइन नंबर 1967 है। कुछ राज्यों में अतिरिक्त स्थानीय नंबर भी हैं। नीचे सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्य संपर्क विवरण दिए गए हैं (मुख्यालय का पता, फोन नंबर और ईमेल जहां उपलब्ध)। ये विवरण आधिकारिक स्रोतों से संकलित हैं। यदि आपको मोबाइल नंबर की आवश्यकता है, तो आधार से लिंक्ड रजिस्टर्ड मोबाइल का उपयोग करें, क्योंकि योजना में...

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्रचार (campaign) बंद होण्याची तारीख आणि वेळ: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे (मतदान ७:३० AM ते ५:३० PM पर्यंत).

 भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। 29 महानगरपालिकाओं (जिसमें BNCMC भी शामिल है) के लिए एक ही चरण में चुनाव हो रहे हैं। सामान्य नियमों के अनुसार, प्रचार मतदान शुरू होने से ठीक पहले मतदान के दिन सुबह 7:30 बजे तक बंद हो जाता है (यानी 15 जनवरी 2026 को सुबह 7:30 बजे से प्रचार पूरी तरह प्रतिबंधित)। कुछ स्थानीय निकायों में प्रचार पिछले दिन रात 10 बजे तक बंद होता है, लेकिन महानगरपालिका चुनावों (जैसे BMC, BNCMC आदि) के लिए आधिकारिक रूप से प्रचार समाप्ति मतदान शुरू होने के समय (15 जनवरी सुबह 7:30 बजे) मानी जाती है। मुख्य तिथियाँ (संक्षेप में): नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि: 30 दिसंबर 2025 नामांकन की जांच: 31 दिसंबर 2025 नाम वापसी की अंतिम तिथि: 2 जनवरी 2026 अंतिम उम्मीदवार सूची: 3 जनवरी 2026 मतदान: 15 जनवरी 2026 (7:30 AM से 5:30 PM) मतगणना: 16 जनवरी 2026 प्...

भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल

  भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल भिवंडी, 10 अगस्त 2026: भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिका में काम करने वाले अधिकारियों और कर्मचारियों की ओर से महाराष्ट्र राज्य जाति कर्मचारी कल्याण महासंघ  ने अनिश्चितकालीन हड़ताल का अंतिम नोटिस जारी किया है। महासंघ का कहना है कि पिछले कई वर्षों से लंबित सेवा लाभ और पदोन्नतियां न मिलने के कारण कर्मचारियों का धैर्य अब जवाब दे चुका है। महासंघ के  अध्यक्ष दीपक राव द्वारा जारी पत्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुमित्राअजित पवार समेत राज्य सरकार के वरिष्ठ अधिकारियों तथा भिवंडी महानगरपालिका प्रशासन को चेतावनी दी गई है।  पत्र में कहा गया है कि इस नोटिस की प्राप्ति से 30 दिनों के अंदर सभी लंबित मांगें पूरी नहीं हुईं तो आवश्यक सेवाओं सहित अनिश्चितकालीन हड़ताल की जाएगी। प्रमुख मांगें छठे और सातवें वेतन आयोग के लंबित अंतर (एयरियर्स) एश्योर्ड प्रोग्रेस स्कीम के तहत 12 और 24 वर्ष की सेवा पूरी करने पर म...