सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यात आरोग्यसेवेचा व्यापक जागर* *४४८ आरोग्य शिबिरांमधून २९ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ* *आरोग्य तपासणीसोबतच मानसिक आरोग्य, पोषण, महिला आरोग्य, असंसर्गजन्य आजार व व्यसनमुक्ती जनजागृतीवर विशेष भर*
*‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ठाणे जिल्ह्यात आरोग्यसेवेचा व्यापक जागर*
*४४८ आरोग्य शिबिरांमधून २९ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ*
*आरोग्य तपासणीसोबतच मानसिक आरोग्य, पोषण, महिला आरोग्य, असंसर्गजन्य आजार व व्यसनमुक्ती जनजागृतीवर विशेष भर*
ठाणे, दि. ६ ऑक्टोबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आरोग्यसेवा केवळ रुग्णालयाच्या चार भिंतींपुरती मर्यादित न ठेवता ती थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा व्यापक प्रयत्न ठाणे जिल्ह्यात करण्यात येत आहे. आरोग्य तपासणी, आजारांचे लवकर निदान, प्रतिबंधात्मक आरोग्य, मानसिक आरोग्य, पोषण, महिला व किशोरवयीन आरोग्य तसेच निरोगी जीवनशैलीबाबत जनजागृती अशा विविध अंगांनी दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत जिल्ह्यात ४४८ विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून तब्बल २९ हजार १२८ नागरिकांना विविध आरोग्यसेवा व जनजागृती उपक्रमांचा लाभ देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात हे अभियान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत केवळ आजारांवरील उपचारांवर भर न देता आजार होण्यापूर्वीच त्यांचा प्रतिबंध, नियमित आरोग्य तपासणी आणि नागरिकांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची सवय निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यामध्ये आरोग्य तपासणी शिबिरे, योग व ध्यान सत्रे, महिलांचे आरोग्य व स्वच्छता शिबिरे, अवयवदान संकल्प अभियान, पोषण व अॅनिमिया जनजागृती, आयुष्मान भारत कार्ड वाटप, किशोरवयीन मुला-मुलींसाठी क्षमता बांधणी उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य शिबिरे, मोतीबिंदू तपासणी, मानसिक आरोग्य स्क्रीनिंग व समुपदेशन, निरोगी जीवनशैलीविषयक जनजागृती, व्यसनमुक्ती जनजागृती व समुपदेशन आदी उपक्रमांचा समावेश आहे.
अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद ठाणे येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच आतापर्यंत आरोग्य तपासणीची ५१ शिबिरे, पोषण व अॅनिमिया जनजागृतीची ५१ शिबिरे, महिलांचे आरोग्य व स्वच्छतेची ५५ शिबिरे, योग व ध्यानाची ४५ सत्रे, मानसिक आरोग्य स्क्रीनिंग व समुपदेशनाची २१ शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.
याशिवाय किशोरवयीन मुला-मुलींसाठी २२ उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी २२ विशेष आरोग्य शिबिरे, मोतीबिंदू तपासणीची १० शिबिरे आणि निरोगी जीवनशैलीविषयक १३ जनजागृती उपक्रम राबविण्यात आले आहेत.
असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी NCD तपासणीची ७ शिबिरे घेण्यात आली असून, NCD संदर्भातील रुग्णांच्या पाठपुराव्यासाठी १३ उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच अवयवदान संकल्प अभियानांतर्गत १६ उपक्रम घेऊन नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुर्बल व आजारग्रस्त बालकांचा शोध घेऊन आवश्यक तपासणी व संदर्भसेवा उपलब्ध करून देण्याचे कामही करण्यात येत आहे.
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, व्यायाम व योग, मानसिक आरोग्याची काळजी, व्यसनांपासून दूर राहणे आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर असंसर्गजन्य आजारांचे वेळीच निदान होण्यासाठी नागरिकांना आवश्यक तपासणी करून घेण्याबाबत प्रोत्साहित केले जात आहे.
आरोग्यसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित न राहता नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून प्रतिबंधात्मक आरोग्याची चळवळ अधिक व्यापक करण्याचे माध्यम म्हणून ‘सेवा संकल्प अभियान’ कार्यरत आहे. या अभियानाच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या विविध सेवा आणि जनजागृती उपक्रमांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏


Comments