*ठाणे जिल्ह्यात नवरात्रोत्सवासाठी सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी* *जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश*
*ठाणे जिल्ह्यात नवरात्रोत्सवासाठी सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी*
*जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश*
ठाणे, दिनांक :- 17/10/2026 : ठाणे जिल्ह्यातील नवरात्रौत्सवाचा उत्साह लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी आणि गरबा आयोजकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे.जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी एका आदेशान्वये नवरात्रोत्सवानिमित्त सलग तीन दिवस म्हणजेच १७, १८ आणि १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक (लाऊडस्पीकर) वापरण्यास मंजुरी दिली आहे.
ध्वनी प्रदूषण नियम, २००० नुसार एका वर्षात एकूण १५ दिवस सणांसारख्या विशेष प्रसंगी रात्री १० ते १२ या वेळेत ध्वनिक्षेपक वापरासाठी दोन तासांची अतिरिक्त सूट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, त्यानुसार यापूर्वी १७ ऑक्टोबर (शनिवार) आणि १९ ऑक्टोबर (सोमवार) या दोन दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली होती मात्र, ठाणे जिल्ह्यात नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याने आयोजक व नागरिकांची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत मध्यंतरीचा दिवस म्हणजेच १८ ऑक्टोबर (रविवार) या दिवशीही रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे आता शनिवारी, रविवारी आणि सोमवारी अशा सलग तीन दिवशी ठाणेकरांना रात्री १२ वाजेपर्यंत नवरात्रौत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.
हा निर्णय देताना जिल्हा प्रशासनाने काही महत्त्वाच्या अटी व शर्ती देखील लागू केल्या आहेत. ही सवलत केवळ वापराच्या वेळेपुरतीच मर्यादा वाढवून देण्यासाठी असून ध्वनीच्या आवाजाची मर्यादा (डेसिबल पातळी) सर्व नियमांनुसार पाळणे अनिवार्य राहील. तसेच उत्सव आयोजकांनी ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी संबंधित स्थानिक पोलीस व सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या परिसरांमध्ये ध्वनिक्षेपकासंबंधी लागू असणारे नियम व निर्बंध पाळावे लागतील आणि रात्री १२ वाजता ध्वनिवर्धक पूर्णपणे बंद करावे लागतील.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत. नियमांचे काटेकोर पालन करत सर्व नागरिकांनी अत्यंत उत्साहात आणि आनंदात उत्सव साजरा करावा, असे आवाहन ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏

Comments