जिल्हा परिषद, ठाणे *सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुकंपा तत्वावर पदभरती व पदोन्नती आदेशांचे वितरण* *सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-४ मधील तीन कर्मचारी यांना आरोग्य संवर्गातील वर्ग 3 पदावर पदोन्नती तसेच वर्ग-4 पदावर अनुकंपा तत्वावर पदभरती*
जिल्हा परिषद, ठाणे
*सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुकंपा तत्वावर पदभरती व पदोन्नती आदेशांचे वितरण*
*सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-४ मधील तीन कर्मचारी यांना आरोग्य संवर्गातील वर्ग 3 पदावर पदोन्नती तसेच वर्ग-4 पदावर अनुकंपा तत्वावर पदभरती*
ठाणे, दि. ०५ ऑक्टोबर २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद, ठाणेच्या सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-४ मधील तीन शिपाई कर्मचारी यांना पदोन्नतीने आरोग्य संवर्गातील आरोग्य सेवक पुरूष या पदावर पदोन्नतीने नियुक्ती तसेच वर्ग 4 शिपाई पदावर अनुकंपा तत्वावर पदभरतीने नियुक्ती देण्यात आली. या अनुषंगाने पदभरती व पदोन्नती आदेशांचे वितरण आज, दि. ०५ ऑक्टोबर, २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते त्यांच्या दालनात करण्यात आले.
सेवाकाळात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत संधी देण्यात येते. या माध्यमातून संबंधित कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्यासोबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होते. सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही करून अनुकंपा पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
तसेच, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे वर्ग-४ मधील तीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील पात्रता व नियमानुसार आरोग्य सेवक पुरूष वर्ग-३ पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेत पुढील जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा विभागाच्या कामकाजासाठी उपयोग होणार आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांना नवीन पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शासकीय सेवेत नागरिकांना दर्जेदार व वेळबद्ध सेवा देणे ही अधिकारी-कर्मचाऱ्यांची महत्त्वाची जबाबदारी असून, पदोन्नती नंतरही सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकता यांना प्राधान्य देऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्याचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. शासनाच्या नियमांनुसार पात्र प्रकरणांमध्ये वेळेत कार्यवाही करून लाभार्थ्यांना आवश्यक सेवा-संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून कर्मचारी कल्याण, प्रशासकीय कार्यक्षमता आणि वेळबद्ध सेवा यांना प्राधान्य देत जिल्हा परिषद ठाणेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏





Comments