प्रशासकीय यंत्रणांचा थेट नागरिकांच्या दारी समन्वय भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळात 'लोकसंवाद' उपक्रमातून कल्याणकारी योजनांचा जागर
*प्रशासकीय यंत्रणांचा थेट नागरिकांच्या दारी समन्वय*
*भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळात 'लोकसंवाद' उपक्रमातून कल्याणकारी योजनांचा जागर*
ठाणे,दि.21 सितंबर 2026 : शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती थेट नागरिकांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवून त्यांना प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने भिवंडी येथील 'धामणकर नाका मित्र मंडळ' येथे 'लोकसंवाद' या अभिनव उपक्रमांतर्गत विशेष मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत कार्यरत असलेले जिल्हा माहिती कार्यालय, महसूल विभाग, भिवंडी महानगरपालिका, समाजकल्याण विभाग आणि महिला व बालविकास या प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येत नागरिकांशी थेट संवाद साधल्याने हा उपक्रम विशेष प्रभावी ठरला. या सत्राला भिवंडीचे तहसिलदार अभिजीत खोले, भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, समाज विकास अधिकारी मिलिंद पळसुले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या प्रतिनिधी म्हणून महिला संरक्षण अधिकारी लक्ष्मी राठोड तसेच आरोग्य अधिकारी डॉ.बुशरा सय्यद यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
'लोकसंवाद' उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट विशद करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि एकाच व्यासपीठावर विविध विभागांच्या योजनांचा लाभ मिळवून घेता यावा, यासाठी प्रशासन अशा संवादात्मक उपक्रमांवर भर देत आहे.
या सत्रात महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला संरक्षण अधिकारी लक्ष्मी राठोड यांनी एकल महिला सर्वेक्षण मोहिमेचे महत्त्व विशद करून निराधार, विधवा व परित्यक्ता महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला, तसेच घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी, महिलांचे कायदेशीर अधिकार आणि त्यांना उपलब्ध असणारे संरक्षण व कायदेशीर साहाय्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
तहसिलदार अभिजीत खोले यांनी महसूल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या 'संजय गांधी निराधार अनुदान योजना' व इतर सामाजिक सहाय्य योजनांचे निकष व कार्यपद्धती स्पष्ट करून गरजूंना दिलासा देणाऱ्या 'सेवा संकल्प' मोहिमेची माहिती दिली.
भिवंडी महानगरपालिकेचे अपर आयुक्त विठ्ठल डाके आणि समाज विकास अधिकारी पळसुले यांनी नागरी भागातील वंचित घटकांसाठी महापालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी व समाज विकास योजनांवर प्रकाश टाकला.
तसेच आरोग्य अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांनी नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सर्वसमावेशक आरोग्य योजना, तपासणी सुविधा आणि आरोग्याशी निगडित शासकीय साहाय्याविषयी सखोल माहिती दिली.
धामणकर नाका मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी या लोकसंवाद कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या आणि विविध शासकीय विभागांच्या अशा एकत्रित पुढाकारामुळे आणि थेट संवादामुळे "लोकसंवाद" हा कार्यक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏






Comments