गणेशोत्सव २०२६: कोकणात जाणाऱ्या भक्तांना १७ दिवस पथकर माफी; विशेष पास उपलब्ध
मुंबई, ८ सप्टेंबर २०२६: आगामी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिपत्रकानुसार ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोकण दिशेने जाणाऱ्या वाहनांना आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसेसना पथकरातून पूर्ण सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
या सवलतीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४८), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६), सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणात जाणारे रस्ते तसेच अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू यांचा समावेश आहे.
कसा मिळेल पास?
भक्तांसाठी “गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन” अशा आशयाचे विशेष स्टीकर स्वरूपाचे पथकर माफी पास उपलब्ध करण्यात येणार आहेत. या पासवर वाहन क्रमांक, चालकाचे नाव इत्यादी माहिती नमूद करावी लागेल. हे पास पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) येथे उपलब्ध असतील. परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांनी समन्वय साधून आवश्यक संख्येनुसार हे पास वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. हे पास परतीच्या प्रवासासाठीही वैध असतील.
एमएसआरटीसीच्या बसेससाठी संबंधित जिल्ह्यातील पोलीस विभाग किंवा आरटीओ कार्यालयाकडून हे पास उपलब्ध करून दिले जातील. गौरी-गणपती वाहतुकीसाठी रवाना होणाऱ्या बसेसना हे पास लावून पाठवण्यात येईल.
जनजागृती व अंमलबजावणी
पोलीस आणि परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात या पास सुविधेबाबत जनतेला माहिती देण्यासाठी आवश्यक अधिसूचना व जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, असेही परिपत्रकात म्हटले आहे. पासेसच्या संख्येबाबतची एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप सचिवांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२६०९०८१७०७५९०४१८ असा आहे. परिपत्रकावर अवर सचिव राजेश पां. भोगले यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
कोकणातील गणेशोत्सव हा लाखो भक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या वर्षी पथकर माफी आणि सोईसुविधा उपलब्ध करून शासनाने भक्तांना मोठा दिलासा दिला आहे. भक्तांनी पास मिळवण्यासाठी वेळेवर संबंधित कार्यालयांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम🙏






Comments
Post a Comment