राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी* *संरक्षण मंत्रालयाला 'राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६' पटकावले प्रथम स्थान
*राजभाषा हिंदीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी*
*संरक्षण मंत्रालयाला 'राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६' पटकावले प्रथम स्थान*
*ठाणे, दिनांक :- 15/09/2026 *: राजभाषा हिंदीच्या प्रभावी आणि उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या राजभाषा विभागाकडून संरक्षण मंत्रालयाला मानाच्या 'राजभाषा कीर्ती पुरस्कार २०२५-२६' ने सन्मानित करण्यात आले आहे. ३०० हून अधिक कर्मचारी संख्या असलेल्या मंत्रालये व विभागांच्या श्रेणीमध्ये संरक्षण मंत्रालयाने देशभरातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे १४ सप्टेंबर रोजी आयोजित 'हिंदी दिन सोहळा' तसेच '6 व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलना'च्या दिमाखदार मंचावर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनीष त्रिपाठी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आयोजित या दोन दिवसीय संमेलनात देशभरातील विविध केंद्रीय मंत्रालये, शासकीय विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका आणि नगर राजभाषा अंमलबजावणी समितीचे (नराकास) अधिकारी मिळून सुमारे ७,००० हून अधिक हिंदीप्रेमी व प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
संरक्षण मंत्रालयाला मिळालेला हा गौरव म्हणजे कामकाजात राजभाषेचा प्रभावी वापर, सातत्यपूर्ण बांधिलकी आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक निष्ठेची पोचपावती आहे. अधिकृत कामकाजात हिंदीचा अधिकाधिक आणि गुणात्मक वापर वाढवण्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम🙏

Comments