*बालकांचे संरक्षण, कायदे आणि कल्याणकारी योजनांची डोंबिवलीत जनजागृती*
*शिवराज गणेश मंडळात 'लोकसंवाद अभियाना'ला उत्साहपूर्ण प्रतिसाद*
ठाणे,दि.21 सितंबर 2026 : बालकांचे सर्वांगीण हक्क अबाधित राखणे, त्यांच्या सुरक्षिततेविषयी समाजात व्यापक जागृती निर्माण करणे आणि शासकीय योजनांचा थेट लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे या उद्दिष्टाने, ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकारातून आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नमिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यातील डोंबिवली येथील ‘शिवराज गणेश मंडळ’ येथे ‘लोकसंवाद अभियान’ अंतर्गत विशेष प्रबोधनपर सत्र पार पडले.
या कार्यक्रमात संरक्षण अधिकारी, डोंबिवली यांनी उपस्थित बालके, पालक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत कायदेविषयक व कल्याणकारी योजनांचे सविस्तर मार्गदर्शन केले.
नागरिक व प्रशासनातील दुरावा कमी करून थेट जनसंपर्कातून माहितीचा प्रसार करणे हे ‘लोकसंवाद’ या अभिनव उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
या उपक्रमाची पार्श्वभूमी विशद करताना, महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्षात गरजू बालकांपर्यंत कशा पोहोचू शकतात, यावर प्रकाश टाकण्यात आला. सत्रादरम्यान संरक्षण अधिकारी यांनी विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘बालसंगोपन योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेचे निकष, अनाथ व निराधार बालकांसाठी मिळणारे आर्थिक पाठबळ आणि अर्ज प्रक्रिया उलगडून सांगितली. यासोबतच बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी, बालविवाहाचे समाजावर व बालमनावर होणारे दुष्परिणाम, तसेच लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या ‘पोक्सो’ (POCSO) कायद्याची वैशिष्ट्ये अत्यंत सुलभ शब्दांत समजावून सांगण्यात आली.
कोणत्याही अनुचित प्रकाराची तक्रार निःसंकोचपणे यंत्रणेकडे कशी नोंदवावी आणि सुरक्षित वातावरणात बालकांचा विकास कसा साधावा, याचेही धडे यावेळी देण्यात आले.
शिवराज गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित मुलांनी या संवादामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. बालकांच्या सुरक्षिततेसाठी व बालहक्कांच्या रक्षणासाठी मंडळाच्या स्तरावरही सातत्याने पुढाकार घेण्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली, तर मुलांनीही प्रशासनाशी थेट साधलेल्या या संवादाचे स्वागत केले.
जिल्हा माहिती कार्यालय आणि महिला व बालविकास विभागाच्या या जनतेपर्यंत थेट पोहोचणाऱ्या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांमध्ये शासनाप्रति सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏

Comments