ठाणे जिल्ह्यात ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ ॲपद्वारे खत विक्री सुरळी २० दिवसांत ॲपद्वारे बुकिंग करून २९० मेट्रिक टन खताची विक्री; शेतकऱ्यांना घरबसल्या खत बुकिंगची सुविधा
जिल्हा परिषद, ठाणे
*ठाणे जिल्ह्यात ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ ॲपद्वारे खत विक्री सुरळीत*
*२० दिवसांत ॲपद्वारे बुकिंग करून २९० मेट्रिक टन खताची विक्री; शेतकऱ्यांना घरबसल्या खत बुकिंगची सुविधा*
ठाणे, दि. १५ सप्टेंबर २०२६ (जिल्हा परिषद ठाणे) : केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ (FFS) ॲपद्वारे ठाणे जिल्ह्यामध्ये दि. २७ ऑगस्ट, २०२६ पासून खत विक्रीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली आहे. या नवीन डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या आवश्यक खताचे बुकिंग करता येत असून, बुकिंगनंतर प्राप्त होणारा QR कोड संबंधित निवडलेल्या कृषी सेवा केंद्रावर दाखवून खत खरेदी करता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली खत विक्री व वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणणे, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य वेळी खत उपलब्ध करून देणे तसेच संपूर्ण खत वितरण व्यवस्थेचे प्रभावी व्यवस्थापन करणे हा FFS प्रणालीचा प्रमुख उद्देश आहे. या प्रणालीमुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनावश्यक वेळ खर्च करावा लागणार नाही. तसेच प्रत्यक्ष खत उपलब्धता व विक्री प्रक्रियेबाबत अधिक सुलभता निर्माण होऊन शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व आर्थिक खर्चाची बचत होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यासह एकूण सात जिल्ह्यांमध्ये या नवीन प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. ठाणे जिल्ह्यात मागील २० दिवसांच्या कालावधीत FFS ॲपद्वारे बुकिंग करून २९० मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात FFS प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व निविष्ठा विक्रेते तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच ग्रामसभा व इतर ग्रामस्तरीय कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना FFS ॲपची माहिती देऊन त्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना ॲप वापरताना येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय हेल्प डेस्कची निर्मिती करण्यात आली असून, त्यांचे संपर्क क्रमांकही शेतकऱ्यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ (FFS) हे ॲप Google Play Store वर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून Agri Stack ID किंवा आधारच्या माध्यमातून नोंदणी करावी. त्यानंतर आपल्या जमिनीची व पिकांची माहिती तपासून खात्री करावी.
Agri Stack ID च्या माध्यमातून लॉगिन केल्यास संबंधित जमिनीची माहिती प्रणालीमध्ये आपोआप उपलब्ध होते. मात्र, आधारच्या माध्यमातून लॉगिन केल्यास जमिनीची माहिती स्वतः भरावी लागते. त्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार संबंधित गट निवडून आवश्यक खतासाठी बुकिंग करावे. खत उपलब्ध असलेल्या निविष्ठा विक्रेत्यांच्या यादीमधून शेतकऱ्याला आपल्या सोयीचा विक्रेता निवडता येतो.
बुकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारा QR कोड तीन दिवसांसाठी वैध राहणार आहे. या कालावधीत संबंधित कृषी सेवा केंद्रावर QR कोड दाखवून खताची खरेदी करता येईल. त्यानंतर पुन्हा खत खरेदी करावयाची असल्यास नवीन बुकिंग करून नवीन QR कोड प्राप्त करणे आवश्यक आहे.
FFS ॲपच्या माध्यमातून खत बुकिंग व खरेदीची प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ, पारदर्शक आणि सोयीस्कर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून आवश्यकतेनुसार ॲपच्या माध्यमातून खताचे बुकिंग करावे व खताची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम🙏

Comments