रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थेसाठी शासनामार्फत प्राप्त ३४ पेट्रोल कार्डचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते पेट्रोल कार्डचे वाटप; ग्रामीण भागातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम होण्यास मदत
जिल्हा परिषद, ठाणे
*रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थेसाठी शासनामार्फत प्राप्त ३४ पेट्रोल कार्डचे वितरण*
*मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते पेट्रोल कार्डचे वाटप; ग्रामीण भागातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम होण्यास मदत*
ठाणे, दि. ०८ सप्टेंबर, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीच्या व अत्यावश्यक आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. रुग्णवाहिकांसाठी इंधनाची उपलब्धता सातत्याने राहावी आणि इंधन भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, यासाठी शासनामार्फत प्राप्त झालेल्या पेट्रोल कार्डचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आज, दि. ०८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांसाठी तसेच जिल्हा मुख्यालयातील रुग्णवाहिकेसाठी असे एकूण ३४ पेट्रोल कार्डचे वितरण करण्यात आले.
या पेट्रोल कार्डच्या माध्यमातून संबंधित रुग्णवाहिकांना एचपी पेट्रोल पंपावर जाऊन कार्डचा वापर करून आवश्यक इंधन भरता येणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिका सेवेसाठी इंधन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत आवश्यक त्या आरोग्य संस्थेत पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे.
पेट्रोल कार्डच्या खात्यात दररोज रक्कम जमा होणार
रुग्णवाहिकांसाठी वितरित करण्यात आलेल्या पेट्रोल कार्डच्या खात्यामध्ये दररोज नियोजित रक्कम जमा करण्यात येणार आहे. संबंधित रुग्णवाहिका चालक अथवा अधिकृत व्यक्ती एचपी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल कार्डचा वापर करून रुग्णवाहिकेसाठी आवश्यक इंधन भरू शकणार आहे.
या व्यवस्थेमुळे रुग्णवाहिकांना आवश्यकतेनुसार इंधन उपलब्ध होण्यास मदत होणार असून, इंधन व्यवस्थापनातील सुलभता आणि सातत्य राखण्यासही मदत होणार आहे. परिणामी रुग्णवाहिका सेवा अधिक कार्यक्षमपणे आणि अखंडितपणे उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, गंभीर रुग्णांना आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संदर्भित आरोग्य संस्थेत तातडीने पोहोचविता यावे आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवा प्रभावीपणे उपलब्ध व्हावी, यासाठी रुग्णवाहिकांची कार्यक्षमता महत्त्वाची आहे.
शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पेट्रोल कार्डचे वितरण करण्यात आल्यामुळे रुग्णवाहिकांच्या इंधन व्यवस्थेला अधिक सुलभता प्राप्त होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून रुग्णांना ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच आवश्यकतेनुसार इतर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये वेळेत स्थलांतरित करण्यासाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे.
जिल्हा परिषद, ठाणेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांसाठी पेट्रोल कार्ड वितरित करण्यात आले. तसेच जिल्हा मुख्यालयातील एका रुग्णवाहिकेसाठीही पेट्रोल कार्ड देण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण ३४ पेट्रोल कार्डचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णवाहिका सेवेसाठी शासनामार्फत प्राप्त पेट्रोल कार्डचे वितरण हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग असून, या सुविधेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम🙏


Comments
Post a Comment