Skip to main content

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव

जिल्हा परिषद, ठाणे


*उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव*


*ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक उपक्रमांवर भर*



ठाणे, दि. ४ सप्टेंबर, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत आज, दि. ०४ सप्टेंबर, २०२६ रोजी बी. जे. हायस्कुल येथे  ‘जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७’ सोहळा उत्साहात पार पडला.


या कार्यक्रमास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, उपशिक्षणाधिकारी संदीप पाटील, नगरसेवक विकास पाटिल, उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडीत, शुभांगी बढे,  विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजाराव, जिल्हा समन्वयक अनिल कुर्हाडे यांच्यासह सर्व गट शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा, सोनाळे येथील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले.



आमदार संजय केळकर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि भवितव्याची घडण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे त्यांनी सांगितले.


शिक्षकांना कामकाज करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत विधानसभेतही सातत्याने भूमिका मांडत असून, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भातही पुढील काळात प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांना शुभेच्छा देत, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांनी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


आमदार निरंजन डावखरे यांनी शिक्षकांचे अभिनंदन करताना शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. आज इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग विद्यार्थ्यांच्या जवळ आले आहे. या तंत्रज्ञानातील चांगल्या आणि उपयुक्त बाबींची विद्यार्थ्यांना ओळख करून देत त्यांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे त्यांनी आवाहन केले.


आजचे विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रांत काम करताना आपली वेगळी ओळख निर्माण करतील. विद्यार्थ्यांच्या यशाचा अभिमान शिक्षकांना वाटावा, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.


शिक्षकांच्या नावापुढे ‘Tr.’ ही पदवी लावण्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका मांडत यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन केले.



आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनाही पुरस्कार देण्याची मागणी करत सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मार्गदर्शन करताना आश्वासित प्रगती योजना, आंतरजिल्हा बदली आणि पवित्र पोर्टलवरील भरती यांसारख्या विषयांवरही त्यांनी भाष्य केले.


जिल्हा परिषदेची एकही शाळा बंद होणार नाही, याची जबाबदारी आपली आणि सर्व शिक्षकांची असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या काळात अनेक विद्यार्थी मोबाईलच्या आहारी जात आहेत. त्यांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवून चांगले आणि सक्षम आयुष्य घडविण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.


ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत काम करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेण्यासाठी हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून, अशा पुरस्कारांमुळे शिक्षकांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.


विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच इस्रोसंदर्भातील शैक्षणिक उपक्रम तसेच मिशन शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना आजची ‘जेन झी’ (Gen Z) पिढी ही वेगळी आव्हाने आणि मोठ्या संधी घेऊन आपल्या समोर असल्याचे सांगितले. या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांसह पुढे घेऊन जाणे आणि त्यांच्या जिज्ञासेला योग्य दिशा देणे ही शिक्षकांची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.


जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता अधिक उत्कृष्ट करण्यासाठी शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासातही शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शिक्षकांनी आपल्या सामाजिक भूमिकेला दुजोरा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.


जिल्हा परिषद, ठाणेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिशन भरारी’ सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा, त्यांच्या जिज्ञासेला चालना मिळावी आणि विविध क्षेत्रांची ओळख व्हावी यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जिज्ञासा आणि शिकण्याची इच्छा आहे. या जिज्ञासेला योग्य दिशा देऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी करावे, असेही त्यांनी नमूद केले.


शिष्यवृत्ती परीक्षा, ‘विनोबा ॲप’सारख्या डिजिटल साधनांचा वापर तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. ‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध स्तरांवर सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.


जिल्हा परिषद, ठाणेच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनी प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.


शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे, विविध स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना या गुणगौरवातून प्रोत्साहन मिळाले.


पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना जिल्हा परिषद, ठाणेच्या वतीने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.


कार्यक्रमात शाळांमधील सुरक्षितता, स्वच्छता आणि आवश्यक भौतिक सुविधांबाबतही चर्चा करण्यात आली. शाळांच्या इमारती सुस्थितीत ठेवणे तसेच परिसरातील स्वच्छतेसाठी संबंधित ग्रामपंचायतींनी सहकार्य करावे, अशा सूचना देण्यात आल्या.


जिल्हा परिषद, ठाणे शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील जि. प. शाळा मामूची वाडी केंद्र पिंपळोळी येथील प्राथमिक शिक्षक छाया संजय  कोकंदे, भिवंडी तालुक्यातील जि. प. शाळा देवरुंग केंद्र शिवनगर येथील पदवीधर शिक्षक सुभाष गोविंद पाटील, कल्याण तालुक्यातील जि. प. शाळा घोटसई केंद्र गोवेली येथील प्राथमिक शिक्षिका रंजना प्रकाश टेंभे, मुरबाड तालुक्यातील जि. प. शाळा खेडले तळवली केंद्र खेवारे महाज येथील प्राथमिक शिक्षक तानाजी धर्मा जाधव तसेच शहापूर तालुक्यातील जि. प. शाळा कळगाव केंद्र दहिवली येथील पदवीधर शिक्षक वैभव गणपत मांजे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या शिक्षकांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.


कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजाराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र तरे यांनी केले.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि विविध शैक्षणिक संधी उपलब्ध करून देत ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण – सक्षम विद्यार्थी – उज्ज्वल भविष्य’ या दिशेने जिल्हा परिषद, ठाणेचा शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा करण्यात आलेला हा गुणगौरव निश्चितच इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.

🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏 


              मेरा देश मेरा वतन समाचार 




                    🙏 पत्र के🙏




          संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी




नोट........ 👉🙏




 दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏


जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏


जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम🙏

Comments

Popular posts from this blog

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी)

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना: सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के संपर्क विवरण वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना भारत सरकार की एक महत्वपूर्ण पहल है, जो राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) के तहत लाभार्थियों को देशभर में किसी भी उचित मूल्य की दुकान (FPS) से सब्सिडी वाले अनाज प्राप्त करने की सुविधा प्रदान करती है। यह योजना सभी 36 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू है, जिसमें असम हाल ही में शामिल हुआ है। योजना के तहत राशन कार्ड को आधार से सीड करने की आवश्यकता होती है। योजना से संबंधित शिकायतों, जानकारी या सहायता के लिए राष्ट्रीय स्तर पर टोल फ्री हेल्पलाइन नंबर 14445 उपलब्ध है। इसके अलावा, सामान्य PDS हेल्पलाइन नंबर 1967 है। कुछ राज्यों में अतिरिक्त स्थानीय नंबर भी हैं। नीचे सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्य संपर्क विवरण दिए गए हैं (मुख्यालय का पता, फोन नंबर और ईमेल जहां उपलब्ध)। ये विवरण आधिकारिक स्रोतों से संकलित हैं। यदि आपको मोबाइल नंबर की आवश्यकता है, तो आधार से लिंक्ड रजिस्टर्ड मोबाइल का उपयोग करें, क्योंकि योजना में...

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्रचार (campaign) बंद होण्याची तारीख आणि वेळ: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे (मतदान ७:३० AM ते ५:३० PM पर्यंत).

 भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। 29 महानगरपालिकाओं (जिसमें BNCMC भी शामिल है) के लिए एक ही चरण में चुनाव हो रहे हैं। सामान्य नियमों के अनुसार, प्रचार मतदान शुरू होने से ठीक पहले मतदान के दिन सुबह 7:30 बजे तक बंद हो जाता है (यानी 15 जनवरी 2026 को सुबह 7:30 बजे से प्रचार पूरी तरह प्रतिबंधित)। कुछ स्थानीय निकायों में प्रचार पिछले दिन रात 10 बजे तक बंद होता है, लेकिन महानगरपालिका चुनावों (जैसे BMC, BNCMC आदि) के लिए आधिकारिक रूप से प्रचार समाप्ति मतदान शुरू होने के समय (15 जनवरी सुबह 7:30 बजे) मानी जाती है। मुख्य तिथियाँ (संक्षेप में): नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि: 30 दिसंबर 2025 नामांकन की जांच: 31 दिसंबर 2025 नाम वापसी की अंतिम तिथि: 2 जनवरी 2026 अंतिम उम्मीदवार सूची: 3 जनवरी 2026 मतदान: 15 जनवरी 2026 (7:30 AM से 5:30 PM) मतगणना: 16 जनवरी 2026 प्...

भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल

  भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल भिवंडी, 10 अगस्त 2026: भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिका में काम करने वाले अधिकारियों और कर्मचारियों की ओर से महाराष्ट्र राज्य जाति कर्मचारी कल्याण महासंघ  ने अनिश्चितकालीन हड़ताल का अंतिम नोटिस जारी किया है। महासंघ का कहना है कि पिछले कई वर्षों से लंबित सेवा लाभ और पदोन्नतियां न मिलने के कारण कर्मचारियों का धैर्य अब जवाब दे चुका है। महासंघ के  अध्यक्ष दीपक राव द्वारा जारी पत्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुमित्राअजित पवार समेत राज्य सरकार के वरिष्ठ अधिकारियों तथा भिवंडी महानगरपालिका प्रशासन को चेतावनी दी गई है।  पत्र में कहा गया है कि इस नोटिस की प्राप्ति से 30 दिनों के अंदर सभी लंबित मांगें पूरी नहीं हुईं तो आवश्यक सेवाओं सहित अनिश्चितकालीन हड़ताल की जाएगी। प्रमुख मांगें छठे और सातवें वेतन आयोग के लंबित अंतर (एयरियर्स) एश्योर्ड प्रोग्रेस स्कीम के तहत 12 और 24 वर्ष की सेवा पूरी करने पर म...