Skip to main content

ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या 'ज्युनिअर सायंटिस्ट'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक

 *ठाणे जिल्ह्यातील चिमुरड्यांची अंतराळ संशोधनात गगनभरारी;*


*सोहम साळवे आणि अदिती ठक्कर या 'ज्युनिअर सायंटिस्ट'चे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून कौतुक*



ठाणे,दि.4 सितंबर 2026: ठाणे जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी अवकाश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अंतराळ संशोधनात झेप घेणारे बदलापूरचे सोहम साळवे आणि डोंबिवलीची अदिती प्रवीण ठक्कर या दोन्ही बालवैज्ञानिकांची ठाणे जिल्ह्याचे ‘स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर’ म्हणून निवड झाली असून, या यशाबद्दल ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

    पुणे येथील 'स्पेसक्रॅट्स विद्यापीठ' संस्थेच्या वतीने संपूर्ण देशभरातील १ लाख विद्यार्थ्यांमधून टप्प्याटप्प्याने निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी १० हजार विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि अंतिम फेरीत देशभरातून १ हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. या खडतर प्रक्रियेतून ठाणे जिल्ह्यातील सोहम साळवे या विद्यार्थ्याने स्थान मिळवत ज्युनिअर सायंटिस्टचे विशेष प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. या दैदिप्यमान कामगिरीबद्दल सोहमला नुकताच प्रतिष्ठित 'बदलापूर रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. बदलापूर येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या सोहमने वयाच्या अवघ्या नवव्या-दहाव्या वर्षापासून इस्रो-मॅजिका आणि स्पेसक्रॅटच्या माध्यमातून हे प्रशिक्षण सुरू केले होते. मागच्या तीन वर्षांच्या काळात त्याने अंतराळ आणि ब्रह्मांड या विषयावर तब्बल तीन पुस्तके लिहिली असून, तो सध्या 'इंटरनॅशनल सायंटिस्ट प्रोग्राम'च्या दुसऱ्या वर्षात संशोधन करत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स स्पर्धेत त्याने सलग दोन वर्षे सहभाग नोंदवून गतवर्षी 'सिल्व्हर ऑनर' तर यावर्षी 'ब्राँझ ऑनर' पटकावले आहे. सोहमने एका लघुग्रहाचेही यशस्वी संशोधन केले आहे.

  


   त्याचप्रमाणे डोंबिवली येथील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयात इयत्ता ११ वी मध्ये शिक्षण घेणारी अदिती प्रवीण ठक्कर हिनेही अविरत मेहनत घेत अंतराळ विज्ञानात मोठे यश संपादन केले आहे. आठवीत असल्यापासून अवकाश संशोधनाचा ध्यास घेतलेल्या अदितीने ब्रह्मांडात तब्बल १६ लघुग्रहांचा शोध लावला आहे. तिच्या या संशोधनाची थेट अमेरिकेच्या 'नासा' (NASA) या जागतिक अंतराळ संशोधन संस्थेने अधिकृत दखल घेत आपल्या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली आहे.

       या दोन्ही बालवैज्ञानिकांचे शिक्षक डॉ. युवराज लांबोळे आणि स्पेस सायंटिस्ट श्री. प्रवीण वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पेसक्रॅट्स विद्यापीठाने इस्रो, नासा अशा नामांकित जागतिक संस्थांशी संलग्नता ठेवली आहे.त्यांच्याकडे ॲनालॉग ॲस्ट्रॉनॉट, रॉकेट सायंटिस्ट आणि तरुण संशोधकांसह ३७ तज्ज्ञांची भक्कम टीम कार्यरत आहे.    

     देशाचे पंतप्रधान आणि इस्रोचे स्वप्न असलेल्या 'हर घर से सायंटिस्ट' या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी या टीमने पुढाकार घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य स्पेस रिसर्चचे प्रशिक्षण पोहोचवण्यासाठी या दोन्ही ज्युनिअर सायंटिस्टची ठाणे जिल्ह्याचे 'स्पेसक्रॅट ॲम्बेसेडर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


     अशा प्रकारचा मोफत अंतराळ प्रशिक्षण उपक्रम राबवणारा ठाणे हा देशातील पहिला जिल्हा ठरणार असून, येथूनच पुढे संपूर्ण देशव्यापी मोहिमेची सुरुवात होणार आहे.

     या विशेष भेटीदरम्यान डॉ. युवराज लांबोळे, अवकाश वैज्ञानिक प्रवीण वाकोडे यांच्यासह सोहम साळवे आणि अदिती ठक्कर यांचे पालक व जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे उपस्थित होते. 

     जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचे, संशोधक वृत्तीचे आणि पुस्तकरूपी लेखनाचे मनापासून कौतुक करत त्यांना अंतराळ मोहिमांमध्ये भारताचे नाव आणखी मोठे करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏 


              मेरा देश मेरा वतन समाचार 




                    🙏 पत्र के🙏




          संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी




नोट........ 👉🙏




 दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏


जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏


जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम🙏

Comments

Popular posts from this blog

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी)

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना: सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के संपर्क विवरण वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना भारत सरकार की एक महत्वपूर्ण पहल है, जो राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) के तहत लाभार्थियों को देशभर में किसी भी उचित मूल्य की दुकान (FPS) से सब्सिडी वाले अनाज प्राप्त करने की सुविधा प्रदान करती है। यह योजना सभी 36 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू है, जिसमें असम हाल ही में शामिल हुआ है। योजना के तहत राशन कार्ड को आधार से सीड करने की आवश्यकता होती है। योजना से संबंधित शिकायतों, जानकारी या सहायता के लिए राष्ट्रीय स्तर पर टोल फ्री हेल्पलाइन नंबर 14445 उपलब्ध है। इसके अलावा, सामान्य PDS हेल्पलाइन नंबर 1967 है। कुछ राज्यों में अतिरिक्त स्थानीय नंबर भी हैं। नीचे सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्य संपर्क विवरण दिए गए हैं (मुख्यालय का पता, फोन नंबर और ईमेल जहां उपलब्ध)। ये विवरण आधिकारिक स्रोतों से संकलित हैं। यदि आपको मोबाइल नंबर की आवश्यकता है, तो आधार से लिंक्ड रजिस्टर्ड मोबाइल का उपयोग करें, क्योंकि योजना में...

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्रचार (campaign) बंद होण्याची तारीख आणि वेळ: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे (मतदान ७:३० AM ते ५:३० PM पर्यंत).

 भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। 29 महानगरपालिकाओं (जिसमें BNCMC भी शामिल है) के लिए एक ही चरण में चुनाव हो रहे हैं। सामान्य नियमों के अनुसार, प्रचार मतदान शुरू होने से ठीक पहले मतदान के दिन सुबह 7:30 बजे तक बंद हो जाता है (यानी 15 जनवरी 2026 को सुबह 7:30 बजे से प्रचार पूरी तरह प्रतिबंधित)। कुछ स्थानीय निकायों में प्रचार पिछले दिन रात 10 बजे तक बंद होता है, लेकिन महानगरपालिका चुनावों (जैसे BMC, BNCMC आदि) के लिए आधिकारिक रूप से प्रचार समाप्ति मतदान शुरू होने के समय (15 जनवरी सुबह 7:30 बजे) मानी जाती है। मुख्य तिथियाँ (संक्षेप में): नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि: 30 दिसंबर 2025 नामांकन की जांच: 31 दिसंबर 2025 नाम वापसी की अंतिम तिथि: 2 जनवरी 2026 अंतिम उम्मीदवार सूची: 3 जनवरी 2026 मतदान: 15 जनवरी 2026 (7:30 AM से 5:30 PM) मतगणना: 16 जनवरी 2026 प्...

भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल

  भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल भिवंडी, 10 अगस्त 2026: भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिका में काम करने वाले अधिकारियों और कर्मचारियों की ओर से महाराष्ट्र राज्य जाति कर्मचारी कल्याण महासंघ  ने अनिश्चितकालीन हड़ताल का अंतिम नोटिस जारी किया है। महासंघ का कहना है कि पिछले कई वर्षों से लंबित सेवा लाभ और पदोन्नतियां न मिलने के कारण कर्मचारियों का धैर्य अब जवाब दे चुका है। महासंघ के  अध्यक्ष दीपक राव द्वारा जारी पत्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुमित्राअजित पवार समेत राज्य सरकार के वरिष्ठ अधिकारियों तथा भिवंडी महानगरपालिका प्रशासन को चेतावनी दी गई है।  पत्र में कहा गया है कि इस नोटिस की प्राप्ति से 30 दिनों के अंदर सभी लंबित मांगें पूरी नहीं हुईं तो आवश्यक सेवाओं सहित अनिश्चितकालीन हड़ताल की जाएगी। प्रमुख मांगें छठे और सातवें वेतन आयोग के लंबित अंतर (एयरियर्स) एश्योर्ड प्रोग्रेस स्कीम के तहत 12 और 24 वर्ष की सेवा पूरी करने पर म...