भिवंडीत कोहीनुर इमारत कोसळली; १०-१२ जण अडकले
भिवंडी, ३१ जुलै 2026 : भिवंडी तालुक्यातील मौजे नारपोली येथील बालाजी नगर, गंगाराम वाडा येथील कोहीनुर इमारतीचा ‘बी’ विंगचा काही भाग शुक्रवारी रात्री कोसळला. या भीषण दुर्घटनेत अंदाजे १० ते १२ लोक अडकले असल्याची माहिती मिळाली आहे.
ही इमारत तळमजला अधिक चार मजली असून त्यात एकूण ४८ खोल्या होत्या. प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या होत्या. भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने या इमारतीला यापूर्वीच धोकादायक घोषित केले होते. तरीही तिचे डागडुजीचे काम सुरू असताना ही घटना घडली.
रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान इमारतीतून ‘कर-कर, कट-कट’ असा आवाज येत असल्याने काही कुटुंबांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. मात्र काही लोक अजूनही आत होते. ते बाहेर पडत असताना रात्री ११ ते ११.३० वाजताच्या दरम्यान ‘बी’ विंगचा भाग अचानक कोसळला.
अडकलेल्यांमध्ये शामजी पाल (वय ४६), संतोष पांडे उर्फ मुन्ना (वय ४२), मिराज शेख (वय ३५) यांच्यासह काही कामगारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. काही कामगारांची नावे अद्याप माहीत झालेली नाहीत.
घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी, मंडळ अधिकारी भोजणे भाऊसाहेब, भोईवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, माजी नगरसेवक भगवान टावरे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. बचाव कार्यासाठी एनडीआरएफ टीम आणि भिवंडी फायर टीम श्वानपथकाच्या मदतीने अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे. घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि एक जेसीबी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर दुर्घटनेबाबत अधिक माहितीसाठी चौकशी सुरू आहे.🙏
भिवंडीत कोहीनुर इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आई कुत्रीची हृदयद्रावक कहाणी
भिवंडीतील बालाजी नगर येथील कोहीनुर इमारतीचा भाग गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजता कोसळला. इमारत धोकादायक म्हणून घोषित झाली होती आणि दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. NDRF, TDRF, अग्निशमन दल आणि पोलिसांसह बचावकार्य जोरात सुरू आहे.
या भीषण दुर्घटनेत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इमारतीच्या खालील एका कोपऱ्यात एक श्वान (कुत्री) तिच्या पिल्लांसह राहत होती. साधारण १०-१५ दिवसांपूर्वी तिने पिल्लांना जन्म दिला होता. अचानक इमारत कोसळली आणि आई कुत्री व तिची पिल्ले माती-धूळ आणि ढिगाऱ्याखाली अडकली.
NDRF आणि TDRF जवानांनी अथक प्रयत्न करून त्या आई कुत्रीला आणि तिच्या एका पिल्लाला सुखरूप बाहेर काढले. मात्र तिची इतर पिल्ले अजून सापडलेली नाहीत. आपल्या लेकरांना शोधण्यासाठी ती आई कुत्री कासावीस झाली आहे. तिच्या डोळ्यांतली अस्वस्थता आणि हालचालींतील वेदना पाहून तिथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.
ही घटना मातृत्व किती श्रेष्ठ आणि निसर्गदत्त आहे, याचे प्रत्यक्ष दर्शन घडवते. माणूस असो वा मुके प्राणी, लेकरांबद्दलची काळजी आणि तळमळ सारखीच असते. आईचे प्रेम हे निसर्गाने दिलेले सर्वात मोठे वरदान आहे.
या घटनेतून मनुष्यवर्गाला खूप काही शिकण्यासारखे आहे. आपण कितीही व्यस्त असलो तरी कुटुंबाची आणि लेकरांची काळजी घेणे ही खरी जबाबदारी आहे. एक मुकी प्राणी आई आपल्या पिल्लांसाठी जीव ओवाळून टाकते, तर आपण माणसांनी आपल्या नात्यांची जपणूक अधिक संवेदनशीलतेने करायला हवी.
मातृत्व हे केवळ नात्याचे बंधन नाही, तर जीवाला जीवाशी जोडणारी एक शक्ती आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या त्या कुत्रीच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू प्रेम, काळजी आणि त्याग हेच जीवनाचे खरे मूल्य असल्याची आठवण करून देतात.
बचावकार्य सुरू असताना इतर पिल्लांचा शोधही सुरू आहे. सर्व संबंधित यंत्रणा सतर्क आहेत.🙏🏻
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏













Comments