भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी
भिवंडी शहर में दिनांक . 31-07-2026 मौजे नारपोली, घर नं. 1557/0, गंगारामवाडी, नारपोली-2, भिवंडी ही आर.सी.सी. तळ अधिक चार मजले इमारत दि. 30/07/2026 रोजी रात्रौ सुमारे 11:20 वा. दरम्यान अंशतः कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत. याबाबत सदर घटनेच्या ठिकाणी मनपा अग्निशमन विभागाच्या पथकाने तात्काळ हजर राहून बचावकार्यास सुरूवात केली. तद्नंतर एन.आर.डी.एफ. चे पथक रात्रौ 12:20 हजर झाले त्यानंतर 01:00 वा. दरम्यान टी.डी.आर.एफ. चे पथक हजर झाले आहे.
➤ मौजे नारपोली, घर नं. 1557/0, गंगारामवाडी, नारपोली-२, भिवंडी ही आर.सी.सी. तळ अधिक चार मजलेची इमारत प्रथमदर्शनी धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्याने महानगरपालिकेमार्फत दि.०७/०९/२०२० रोजी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट सादर करणेची नोटीस बजाविण्यात आली.
➤ वरील नोटीसच्या अनुषंगाने मालमत्ता धारकांनी स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट सादर न केल्याने मालमत्ता धारकांना दि.२२/०४/२०२२ रोजी स्मरण नोटीस देण्यात आली.
➤ स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट सादर करणेकामी नोटीस बजावूनही मालमत्ता धारकांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने उक्त इमारतीस निर्मनुष्य करणेकामी दि.०५/०६/२०२६ रोजी नोटीसा देण्यात आल्या.
> *तद्नंतर महानगरपालिकेमार्फत उक्त मिळकतीचा पाणी पुरवठा व वीज पुरवठा खंडीत करण्यात येवून इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या कुटूंबांना स्थलांतरित करण्यात आले.*
➤ मालमत्ता धारकांनी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता, बेकायदेशीरपणे इमारत दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याचे निदर्शनास आल्याने दि. ३०/०७/२०२६ रोजी संबंधित सहा. आयुक्त यांनी त्यांचे पथकासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यादरम्यान इमारतीची संरचना अस्थैर्यित होत असल्याचे दिसून आले त्यावेळी महानगरपालिकेच्या पथकाने इमारतीत दुरूस्तीचे काम करणारे मजुर व ११ कुटूंबातील अंदाजे ३५-४० व्यक्तींना तात्काळ बाहेर काढण्यात आले. सदरच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम चालु असल्याचे दिसून आले याबाबत सर्व मजुर कामगार व त्यांचा कॉन्ट्रॅक्टर यांना सदरचे काम तात्काळ बंद करण्याबाबत सुचना देवूनसुध्दा त्यांनी ऐकले नाही तसेच काही रहिवाशी हे देखील बाहेर पडण्यास नकार देत होते याच दरम्यान इमारतीचा मागील भाग कोसळण्यास सुरूवात झाली.
> सदर दुर्घटनेत एकूण ०९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 3 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत त्यांना स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी येथे उपचारा साठी नेण्यात आले आहे..
जखमी व्यक्तींची नावे
१. श्री. अभय कुमार अंदाजे वय २४
२. श्री. दिपककुमार यादव, अंदाजे वय २५
३. श्रीम. संगिता प्रजापती, अंदाजे वय ३६
सदरील जखमींवर स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी येथे उपचार सुरू आहेत.
मृत व्यक्तींची नावे
१. शमीम शेख, अंदाजे वय ४८
२. रणजीत सिंग, अंदाजे वय ३२
३. मिराज रसुल शेख, अंदाजे वय ३४
४. संतोष कुमार पांडे अंदाजे वय ४२
५. शमीम अंसारी, अंदाजे वय ३०
६. अनोळखी व्यक्ती, अंदाजे वय ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
७. अनोळखी व्यक्ती, अंदाजे वय २५ ते ३०, ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
८. अनोळखी व्यक्ती, अंदाजे वय २० ते ३५, ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
९. अनोळखी व्यक्ती, अंदाजे वय ४० ते ४५, ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
तसेच विनापरवानगी दुरूस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏












Comments