*अनुकंपा तत्वावर १४ उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण* *मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान*
*अनुकंपा तत्वावर १४ उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण*
*मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान*
ठाणे,दिनांक : १० जून, २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार मिळावा या उद्देशाने अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची शासनाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे अनुकंपा प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व ज्येष्ठतेनुसार गट (क) व गट (ड) संवर्गात नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, आज दि. ०९ जून, २०२६ रोजी जिल्हा परिषद मुख्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात १४ उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना गट (क) व गट (ड) पदावरील नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी नियुक्ती प्राप्त उमेदवारांचे अभिनंदन करताना त्यांनी सर्वांना प्रामाणिकपणे व जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले.
अनुकंपा नियुक्तीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची नियमानुसार छाननी करून अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ज्येष्ठता व शैक्षणिक पात्रतेच्या आधारे उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली. निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर प्राप्त हरकतींचे नियमानुसार निराकरण करून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार उपलब्ध रिक्त पदांवर गट (क) व गट (ड) संवर्गामध्ये १४ पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, "अनुकंपा नियुक्ती ही केवळ नोकरी देण्याची प्रक्रिया नसून, कठीण परिस्थितीत सापडलेल्या कुटुंबाला आधार देण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. नियुक्ती प्राप्त सर्व उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या सेवेत कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची भावना जपत उत्कृष्ट कार्य करावे. ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देताना संवेदनशीलता आणि उत्तरदायित्व जपणे आवश्यक आहे."
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी सांगितले की, अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता राखण्यात आली असून, वेळोवेळी पाठपुरावा करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले आहेत. भविष्यातही शासनाच्या नियमांनुसार अनुकंपा प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे.
कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वाती पाटील, सहाय्यक प्रशासन अधिकारी नितीन घोडके तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अनुकंपा नियुक्तीमुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असून, शासनाच्या लोकाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏



Comments
Post a Comment