मा. श्री. मुकेश सोनु सारवान, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, मुंबई यांची
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला भेट
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज मंगळवार दि. ०२.०६.२०२६ रोजी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला भेट देऊन सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त तसेच आस्थापना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची स्थिती तपासण्यात आली. सफाई कर्मचाऱ्यांसाठीची श्रमसाफल्य योजना, दुषित गटारामध्ये काम करतांना मृत्यु पावलेल्या/ कायम अपंगत्व/ अपंगत्व आलेल्या मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सना/ सफाई कामगांराना नुकसान भरपाई अदा करणेबाबत प्रकरणांची सद्य:स्थिती, वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांची माहिती व सफाई कामगारांची मंजूर पदे, भरलेली पदे, रिक्त पदे इत्यादीचा आढावा घेण्यात आला तसेच, सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती या बैठकीत घेण्यात आला आहे.
या बैठकी दरम्यान कर्मचारी संघटना यांनी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग यांच्या समोर उपस्थित केलेले मुद्दे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेबाबत, सेवानिवृत्त कर्मचारी यांना अद्याप १२/२४ फरक देण्यात आलेला नाही, वेतन आयोग ६ व ७ यांचा फरक, सफाई कर्मचारी यांना सेवा जेष्ठता प्रमाणे पदोन्नती तसेच वारसा हक्क प्रकरणे, नुकसानभरपाई व रिक्त पदांबाबत माहिती विचारण्यात आली.
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांकरीता तसेच सामाजिक न्याय विभाग व नगरविकास विभाग यांचेकडील शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या विविध योजना यांची अंमलबजावणी करण्यात आली किंवा कसे याबाबत सविस्तर चर्चा आस्थापना विभागातील अधिकाऱ्यांची व मा. अति-आयुक्त श्री विठ्ठल डाके यांचेसोबत करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने (१) शासन निर्णय क्र. सकानि-२००७/प्र.क्र. १७६/२००७/नवि-६, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ दि. २२ ऑक्टोबर २००८ रोजीच्या शासन निर्णयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना बाबत २५ वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा झालेल्या सफाई कामगारांना मालकी तत्वावर मोफत सदनिका देण्याबाबत सद्यस्थितीत प्रकरणांची माहितीचा आढावा घेण्यात आला (२) शासन निर्णय क्र. हामैऊ २०२४/प्र.क्र. ५१/सजक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील दुषित गटारामध्ये काम करतांना मृत्यु पावलेल्या/कायम अपंगत्व/अपंगत्व आलेल्या मॅन्युअल स्कॅव्हेंजर्सना/सफाई कामगारांना नुकसान भरपाई अदा करणेबाबत सद्यस्थितीत प्रकरणांची माहिती घेण्यात आली. (३) शासन निर्णय क्र. सफाई- २०२४/प्र.क्र. ७०/सआक, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार वारसा हक्काच्या प्रलंबीत प्रकरणांची माहिती व सफाई कामगारांचे मंजूर पदे, भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती तसेच आपल्या महानगरपालिकेमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती तयार करून अहवाल सादर करण्याबाबत आयोगातर्फे सूचना देण्यात आलेल्या असून त्यानुषंगाने आयोगास अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही व निर्णय घेणे.
याप्रसंगी मा.उपायुक्त (मुख्यालय) श्री. विक्रम दराडे, श्री. अजय साबळे, मा उपायुक्त (सामान्य प्रशासन) श्री. शैलेश दोंदे, श्री. जमील पटेल (शहर अभियंता), श्री. अनिल प्रधान (विधी अधिकारी), श्री. जनार्दन निपुर्ते उप- कामगार कल्याण अधिकारी, श्री. महेंद्र कुंभारे अखिल महाराष्ट्र जनरल कामगार युनियन,श्री. राजेंद्र काबाडी भिवंडी म्युन्सिपल कर्मचारी युनियन, श्री. संतोष साळवे भिवंडी मनसे कर्मचारी युनियन, श्री. विकास निकम लेवर एकता जनरल युनियन महाराष्ट्र, श्री.संतोष चव्हाण लेबर फ्रन्ट युनियन, व इतर अधिकारी / कर्मचारी, उपस्थित होते.
(श्रीकांत परदेशी)
माहिती व जनसंपर्क अधिकारी
भिवंडी नि. शहर महानगरपालिका भिवंडी
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
जय श्री कृष्ण! 🪔🥭
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏


















Comments
Post a Comment