भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जिल्हा - ठाणे. दिनांक:- 01/05/2026. महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापाना दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी
जिल्हा - ठाणे.
दिनांक:- 01/05/2026.
महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र राज्याच्या ६७ वा स्थापाना दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा.
आज दि. 01-05-2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा ६७ स्थापना दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त मा. महापौर श्री. नारायण रतन चौधरी, यांचे शुभहस्ते राष्ट्र ध्वजवंदन करण्यात आले.
तदनंतर महानगरपालिकेच्या प्रांगणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मा. महापौर श्री. नारायण रतन चौधरी व मा. आयुक्त श्री अनमोल सागर (भा.प्र.से.) यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच जुनी प्रशासकीय इमारती समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास मा. उप-महापौर तारीक अब्दुल बारी मोमीन व मा नगरसेवक फराज (बाबा) बहाउद्दीन यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
तसेच जनगणना २०२६ या कार्यक्रमाअंतर्गत स्वगणना चे शुभारंभ मा. महापौर, उप- महापौर, मा आयुक्त, यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच याप्रसंगी मा नगरसेवक श्री. प्रशांत लाड, फराज (बाबा) बहाउद्दीन यांच्या उपस्थित या कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. भारतात प्रथमच होणाऱ्या डिजिटल जणगणनेसाठी दि. 01-05-2026 ते 15-05-2026 या कालावधीत https://se.census.gov.in या वेबसाईटवर जाऊन मोबाईलद्वारे प्रत्येक नागरिकांना स्वत:ची गणना करता येणार असल्याबाबतची माहिती सहा. आयुक्त (जनगणना) श्री. नितीन पाटील यांनी सर्वाना देण्यात आली.
स्व. इदिरा गांधी स्मृती उप-जिल्हा रुग्णालयाच्या शेजारील हुतात्मा स्मारकांस मा. अति-आयुक्त श्री. विठ्ठल डाके व उप-आयुक्त (मुख्यालय) श्री. विक्रम दराडे यांच्या शुभहस्ते पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला.
याप्रसंगी. मा. अति-आयुक्त श्रीम. नयन ससाणे, मा. उप-आयुक्त (सामान्य प्रशासन) श्रीम. सपना वसावा सहा. आयुक्त जनगणना श्री. नितीन पाटील, सर्व सहा. आयुक्त प्रभाग समिती, समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. मिलिंद पळसुले, मार्केट विभाग प्रमुख श्री स्नेहल पुण्यार्थी, उद्यान विभाग प्रमुख श्री निलेश संखे, शहरविकास प्रमुख श्री समीर जवरे, तसेच मनपा अधिकारी / कर्मचारी, तसेच पत्रकार वर्ग उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क अधिकारी
भिवंडी नि. शहर महानगरपालिका
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏















Comments
Post a Comment