भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी दिनांक : 15.11.2025 भिवंडी शहरातील नागरिकांच्या सकारात्मक सहकार्यामुळे रस्ता रुंदीकरणचे कामाचा शुभारंभ झाला रस्ता रुंदीकरण व शहराचा विकासकामात सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक धन्यवाद
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी
दिनांक : 15.11.2025
*भिवंडी शहरातील नागरिकांच्या सकारात्मक सहकार्यामुळे रस्ता रुंदीकरणचे कामाचा शुभारंभ झाला*
*रस्ता रुंदीकरण व शहराचा विकासकामात सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक धन्यवाद!!*
अंजुर फाटा ते स्वर्गीय राजीव गांधी चौक रस्ता रुंदीकरणाच्या कामास सकारात्मक प्रतिसाद देत अनेक दुकानदारांनी महानगरपालिकेच्या कारवाईच्या पूर्वसंध्येलाच स्वतः अतिक्रमण हटवत साहित्य काढण्याचे काम केले, याबद्दल संबंधित नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
भिवंडी शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण अशा रस्ता रुंदी करण्याच्या कामास मा प्रशासक तथा आयुक्त श्री अनमोल सागर यांच्या निर्देशानुसार सुरवात झाली.
मा अतिरिक्त आयुक्त श्री विठ्ठल डाके आणि मा उपायुक्त (अनधिकृत बांधकाम) श्री विक्रम दराडे यांचे नियंत्रणाखाली आज अंजूर फाटा ते स्व राजीव गांधी चौक या मार्गावरील रस्ता रुंदीकरण काम प्रभाग समिती क्र. 4 चे सहायक आयुक्त गिरीश घोष्टेकर व प्रभाग समिती क्र. ५ चे सहायक आयुक्त सईद चीवणे यांच्या नियंत्रनाखाली या सर्व बाधित प्रकल्पांची तोडकाम करण्यात आले. प्रभाग समिती क्र.४ मध्ये 351 इतक्या घरांना नोटीस देण्यात आल्या होत्या, त्यापैकी आज 107 इतक्या घरांचे तोडकाम पूर्ण करण्यात आले, तरी उर्वरित कार्यवाही हि उद्या दि. 18-11-2025 रोजी करण्यात येणार आहे. तसेच प्रभाग समिती क्र. ५ अंतर्गत 23 इतक्या घरांना नोटीस देण्यात येऊन आज सर्व घरांचे तोडकाम पूर्ण करण्यात आले. याकामी पुरेसा मनुष्यबळ, एकूण 6 जे.सि.बी व 6 डम्पर असे साधन सामुग्री तसेच पोलीसांकडूनही पुरेसा मनुष्बळ उपलब्ध करून देण्यात आले होते.
आजच्या कारवाई वेळी प्रभाग समिती क्रमांक १ चे सहायक आयुक्त मकसूम शेख, प्रभाग समिती क्रमांक २ चे सहायक आयुक्त माणिक जाधव, प्रभाग समिती क्रमांक ३ चे सहायक आयुक्त सुरेंद्र भोईर, शहर विकास प्रमुख समीर जवरे, अतिक्रमण विभाग प्रमुख अरविंद घुगरे, महानगरपालिकेचे सर्व अभियंता व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
*आजच्या या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित ठरणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना महानगरपालिके तर्फे खालील लाभ देण्याचे नियोजन आहे.*
*लाभाचे स्वरूप:-
* पात्र प्रकल्पबाधित नागरिकांना TDR स्वरुपात लाभ देणार
* पात्र लाभार्थ्यांना रोख रक्कम स्वरुपात लाभ मिळण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार
* आगामी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रकल्पांतर्गत पात्र प्रकल्प बाधितांसाठी २०% सदनिका राखीव ठेवणार.
* जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न महानगरपालिका करणार.
* आजच्या करवाईमध्ये पात्र दुकानदारांसाठी भविष्यात कमर्शियल काम्प्लेक्स उभारणार.*
अशाच प्रकारचे विकास कामांकरिता सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनतर्फे करण्यात आले आहे
(श्रीकांत परदेशी)
माहिती व जनसंपर्क अधिकारी
भिवंडी नि. शहर महानगरपालिका

Comments
Post a Comment