*Bappa.org च्या सहाय्याने आपला गणपती बाप्पा जागतीक पातळीवर पोहचवा…* दिनांक : 19 सप्टेंबर, 2026 महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत गणेशोत्सवाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने *‘Bappa.org’* हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागांतील गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा, प्रथा, आठवणी, आरत्या, गणेशमूर्तींची छायाचित्रे, उत्सवातील अनुभव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विविध उपक्रमांची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करून ती पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भिवंडी शहरालाही गणेशोत्सवाची समृद्ध सांस्कृतिक व सामाजिक परंपरा लाभलेली असून, शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या परंपरांचा डिजिटल स्वरूपात दस्तऐवजीकरण होऊन *भिवंडी शहराचा गणेशोत्सवातील सांस्कृतिक वारसा जागतीक स्तरावर पोहोचावा*, यासाठी भिवंडी निज...