कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1A येथे आजपर्यंत ना लिफ्टची सुविधा आहे, ना सरकत्या जिन्याची (Escalator). त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, गर्भवती महिला, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो
कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म १ए वर लिफ्ट-एस्कलेटरची तातडीची मागणी कल्याण शहर / : कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ए वर आजतागायत लिफ्ट किंवा सरकत्या जिन्याची (एस्कलेटर) सुविधा उपलब्ध नसल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, गर्भवती महिला, शस्त्रक्रिया झालेले रुग्ण आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत कोनगाव, भिवंडी येथील दीपिका रामचंद्र निकाळजे यांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे. कल्याणहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून कल्याणकडे येणाऱ्या अनेक लोकल गाड्या प्लॅटफॉर्म १ए वरून धावतात. मात्र या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी प्रवाशांना जिने चढावे लागतात. जिने चढत असताना अनेकदा गाडी सुटते, त्यामुळे प्रवाशांची दमछाक होते, मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि प्रवास असुरक्षित ठरतो, असे निकाळजे यांनी सांगितले. “प्लॅटफॉर्म क्रमांक १ए विशेषतः शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत गैरसोयीचा आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा व सोयीचा विचार करून या प्लॅटफॉर्मवर तातडीने लिफ्ट व सरकत्या जिन्य...