*ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडीच्या आधारे*
*स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करून देण्यास मनाई*
*ठाणे, दिनांक :- 19/10/2026* : ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची डिजिटल ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने फार्मर आयडी (Farmer ID) तयार करण्यात येत आहेत. तथापि, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ओळखपत्रे तयार करून वितरित केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच, अशा प्रकारच्या ओळखपत्रांच्या संदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या अनुषंगाने, केंद्र शासनाच्या दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्राद्वारे ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करणे व त्याचे वितरण करणे अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यामुळे, राज्यातील सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चालकांनी ॲग्रीस्टॅक अंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्रे तयार करणे व त्यांचे वितरण करणे तात्काळ थांबवावे. तसेच, यापुढे अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत कार्यवाही करण्यात येऊ नये, याची संबंधित केंद्रचालकांनी दक्षता घ्यावी.
शेतकऱ्यांनीही याबाबत जागरूक राहून फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र ओळखपत्र तयार करून देण्याच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या अनधिकृत सेवांचा लाभ घेऊ नये. अशा प्रकारे तयार करण्यात आलेल्या ओळखपत्रांना अधिकृत मान्यता असल्याचे समजू नये.
ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडीच्या वापराबाबत केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य, पुणे कृषी आयुक्तालय संचालक ॲग्रीस्टॅक बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇🙏
“सूत्रों के अनुसार…”🪶🙏
👉 संपादक एवं लेखक: समाज सेवक, RTI कार्यकर्ता👈
👉 श्री दयाशंकर गुप्ता जी👈 👉 नमस्कार चमत्कार 👈
👉 मेरा देश मेरा वतन समाचार 👈 👉 बुलंद आवाज न्यूज़ 👈
👉 दया की सोच👈 🙏जनहित के लिए🙏 नोट........ 👉👇🙏
दोस्तों अप सभी पाठकों से उम्मीद करता हूं कि आप सभी ने यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा हैं।
संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई हैं।
तो क्षमा करें इस के लिए हम आप से क्षमा मांगते हैं। और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें? 🪶🙏
🙏 संपादक व लेखक व अध्यक्ष व RTI आरटीआई कार्यकर्ता
श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏
🙏जय संविधान जय भीम जय, संविधान के चौथा स्तंभ की जय 🙏
जय हिंद 🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🙏 वंदे मातरम🙏

Comments