Skip to main content

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) बाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न

 *विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) बाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न*



*ठाणे,दि.१८ जून (जिमाका):* भारत निवडणूक आयोगाच्या दि. १४ मे २०२६ च्या सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या 'विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची (SIR)' पूर्वतयारी आणि अंमलबजावणी याविषयी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ही बैठक यशस्वीपणे संपन्न झाली.    

    या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, तहसिलदार प्रदीप कुडाळ आणि विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

     बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ, सद्यस्थितीतील मतदार संख्या आणि मतदान केंद्रनिहाय रचनेबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर मतदारसंघनिहाय सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या (SIR) ऑनलाइन मॅपिंगच्या प्रगतीचा आणि टक्केवारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) नियुक्तीबाबत राजकीय पक्षांनी केलेल्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेत, सर्वच पक्षांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

*विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे नियोजित वेळापत्रक...*

या मोहिमेंतर्गत अर्हता दिनांक १ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आला असून, निवडणूक प्रशासनाने पुढीलप्रमाणे महत्त्वपूर्ण कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे:

 *दि. २० जून ते २९ जून २०२६:* प्रशिक्षण, प्रशासकीय तयारी आणि आवश्यक साहित्याची छपाई.

*दि. ३० जून ते २९ जुलै २०२६:* मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (BLO) घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी मोहीम.

*दि. २९ जुलै २०२६ पर्यंत:* मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण करणे.

*दि. ५ ऑगस्ट २०२६:* 

प्रारूप मतदारयाद्यांची अधिकृत प्रसिद्धी.

*दि. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६:* 

मतदारयादीबाबत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी.

*दि. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६:* 

नोटीस टप्पा आणि प्राप्त दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया.

*दि. ७ ऑक्टोबर २०२६:* 

अंतिम मतदार यादीची जाहीर प्रसिद्धी.

     यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी बैठकीत या मोहिमेच्या तांत्रिक आणि क्षेत्रीय कामाची सविस्तर माहिती दिली. दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत 'बीएलओ' (BLO) प्रत्येक घरात प्रत्यक्ष भेट देतील. या भेटीदरम्यान मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराला दोन प्रतींमध्ये 'Enumeration Form' दिला जाईल. यातील एक प्रत आवश्यक माहिती भरून आणि मतदार किंवा कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी घेऊन बीएलओ जागेवरच संकलित करतील, तर दुसरी प्रत मतदाराला पोचपावती म्हणून दिली जाईल.

*अपुरी माहिती असलेल्या मतदारांसाठी सुनावणी आणि आवश्यक कागदपत्रे...*

     ज्या मतदारांची माहिती मागील (SIR) (२००२) च्या मतदार यादीत उपलब्ध नाही किंवा निवडणूक आयोगाच्या मुख्य डेटाबेसशी जुळत नाही, अशा मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून (ERO) रीतसर सुनावणीची नोटीस बजावण्यात येईल. अशी नोटीस मिळताच संबंधित मतदारांनी आपले नागरिकत्व व जन्म सिद्ध करणारे खालील पुरावे सादर करणे बंधनकारक राहील:







१. दि.१ जुलै १९८७ पूर्वी भारतात जन्म झालेल्यांसाठी: स्वतःची जन्मतारीख आणि जन्मस्थान सिद्ध करणारा कोणताही एक वैध दस्तऐवज.

२. दि.१ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ या कालावधीत जन्मलेल्यांसाठी: आई किंवा वडील यांपैकी कोणाचाही जन्म भारतात झाल्याचा व जन्मतारीख सिद्ध करणारा पुरावा.

३. दि.२ डिसेंबर २००४ नंतर भारतात जन्मलेल्यांसाठी: पालकांपैकी कोणीही भारतीय नागरिक नसल्यास, मतदाराच्या जन्माच्या वेळचा पालकांचा वैध पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत.

४. भारताबाहेर जन्म झालेल्यांसाठी: परदेशातील भारतीय दूतावासाने जारी केलेला जन्मनोंदणीचा अधिकृत पुरावा.

५. नागरिकीकरणाद्वारे नागरिकत्व मिळालेल्यांसाठी: भारत सरकारचे नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्र.

या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी अंतिम मतदार यादी छपाई होईपर्यंत दर आठवड्याला नियमित आढावा बैठका घेतल्या जाणार आहेत. या साप्ताहिक बैठकांना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सातत्याने उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करावे आणि आपल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींचा (BLA) सहभाग वाढवावा, असे आवाहन या बैठकीत प्रशासनातर्फे करण्यात आले.

🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏 

       मेरा देश मेरा वतन समाचार 

                    🙏 पत्र के🙏

        संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी

नोट........ 👉🙏

 दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏

जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏

#samachar #news #KHABAR #dayashankargupta #news #dsg #fheshbook #instsgram #digitalcreator #sundar #song #gupta #daya #shankar #vidio #SAORT #bulandawaaznews #MeraDeshMeraWatanSamachar #dayakisoch #DSG #Maharashtra #india ❤️🔥💯✌🙏


Comments

Popular posts from this blog

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी)

वन नेशन वन रेशन कार्ड (ओएनओआरसी) वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना: सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के संपर्क विवरण वन नेशन वन राशन कार्ड (ONORC) योजना भारत सरकार की एक महत्वपूर्ण पहल है, जो राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) के तहत लाभार्थियों को देशभर में किसी भी उचित मूल्य की दुकान (FPS) से सब्सिडी वाले अनाज प्राप्त करने की सुविधा प्रदान करती है। यह योजना सभी 36 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों में लागू है, जिसमें असम हाल ही में शामिल हुआ है। योजना के तहत राशन कार्ड को आधार से सीड करने की आवश्यकता होती है। योजना से संबंधित शिकायतों, जानकारी या सहायता के लिए राष्ट्रीय स्तर पर टोल फ्री हेल्पलाइन नंबर 14445 उपलब्ध है। इसके अलावा, सामान्य PDS हेल्पलाइन नंबर 1967 है। कुछ राज्यों में अतिरिक्त स्थानीय नंबर भी हैं। नीचे सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्य संपर्क विवरण दिए गए हैं (मुख्यालय का पता, फोन नंबर और ईमेल जहां उपलब्ध)। ये विवरण आधिकारिक स्रोतों से संकलित हैं। यदि आपको मोबाइल नंबर की आवश्यकता है, तो आधार से लिंक्ड रजिस्टर्ड मोबाइल का उपयोग करें, क्योंकि योजना में...

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी प्रचार (campaign) बंद होण्याची तारीख आणि वेळ: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ही निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे (मतदान ७:३० AM ते ५:३० PM पर्यंत).

 भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका (BNCMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 के लिए प्रचार (campaign) बंद होने की तारीख और समय: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग द्वारा जारी किए गए कार्यक्रम के अनुसार, यह चुनाव 15 जनवरी 2026 को होने वाला है (मतदान सुबह 7:30 बजे से शाम 5:30 बजे तक)। 29 महानगरपालिकाओं (जिसमें BNCMC भी शामिल है) के लिए एक ही चरण में चुनाव हो रहे हैं। सामान्य नियमों के अनुसार, प्रचार मतदान शुरू होने से ठीक पहले मतदान के दिन सुबह 7:30 बजे तक बंद हो जाता है (यानी 15 जनवरी 2026 को सुबह 7:30 बजे से प्रचार पूरी तरह प्रतिबंधित)। कुछ स्थानीय निकायों में प्रचार पिछले दिन रात 10 बजे तक बंद होता है, लेकिन महानगरपालिका चुनावों (जैसे BMC, BNCMC आदि) के लिए आधिकारिक रूप से प्रचार समाप्ति मतदान शुरू होने के समय (15 जनवरी सुबह 7:30 बजे) मानी जाती है। मुख्य तिथियाँ (संक्षेप में): नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि: 30 दिसंबर 2025 नामांकन की जांच: 31 दिसंबर 2025 नाम वापसी की अंतिम तिथि: 2 जनवरी 2026 अंतिम उम्मीदवार सूची: 3 जनवरी 2026 मतदान: 15 जनवरी 2026 (7:30 AM से 5:30 PM) मतगणना: 16 जनवरी 2026 प्...

भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल

  भिवंडी शहर निजामपुर महानगरपालिका कर्मचारियों का अनिश्चितकालीन हड़ताल का अल्टीमेटम 30 दिनों में लंबित वेतन, प्रमोशन और सेवा लाभ न मिले तो हड़ताल भिवंडी, 10 अगस्त 2026: भिवंडी-निजामपुर शहर महानगरपालिका में काम करने वाले अधिकारियों और कर्मचारियों की ओर से महाराष्ट्र राज्य जाति कर्मचारी कल्याण महासंघ  ने अनिश्चितकालीन हड़ताल का अंतिम नोटिस जारी किया है। महासंघ का कहना है कि पिछले कई वर्षों से लंबित सेवा लाभ और पदोन्नतियां न मिलने के कारण कर्मचारियों का धैर्य अब जवाब दे चुका है। महासंघ के  अध्यक्ष दीपक राव द्वारा जारी पत्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सुमित्राअजित पवार समेत राज्य सरकार के वरिष्ठ अधिकारियों तथा भिवंडी महानगरपालिका प्रशासन को चेतावनी दी गई है।  पत्र में कहा गया है कि इस नोटिस की प्राप्ति से 30 दिनों के अंदर सभी लंबित मांगें पूरी नहीं हुईं तो आवश्यक सेवाओं सहित अनिश्चितकालीन हड़ताल की जाएगी। प्रमुख मांगें छठे और सातवें वेतन आयोग के लंबित अंतर (एयरियर्स) एश्योर्ड प्रोग्रेस स्कीम के तहत 12 और 24 वर्ष की सेवा पूरी करने पर म...