शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
जिल्हा परिषद, ठाणे *शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वासिंदच्या नूतन इमारतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण* *ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल* ठाणे, दि. २५ ऑगस्ट २०२६ (जिल्हा परिषद, ठाणे) : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सुलभ आणि नागरिककेंद्रित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या “आरोग्य संस्थांचे लोकार्पण व विविध समिती सदस्यांशी आरोग्य संवाद” या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वासिंद यांच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उत्साहात संपन्न झाले. या राज्यस्तरीय कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव निपुण विनायक, सार्वजनिक आरोग्य आयुक्त संजय काटकर, आयुक्त, शहरी आरोग्य डॉ. सुनील भोकरे तसेच संचालक डॉ. नितीन कंदेवाड हे दूरदृश्य...