महसूल विभागाचा मोठा निर्णय! मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व जमिनींचे महसुली दावे निकाली काढणार
महसूल विभागाचा मोठा निर्णय! मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व जमिनींचे महसुली दावे निकाली काढणार मुंबई / महाराष्ट्र | १७ ऑगस्ट २०२६ क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. राज्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसुली दाव्यांना जलदगतीने आणि कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या सात महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर राबवले जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही महसूल विभागाने जारी केला आहे. काय होणार या अभियानांतर्गत? मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेले सर्व प्रकारचे महसुली दावे आणि अपील या अभियाना...