भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांकरिता दिनांक:-18/08/2026. प्रशिक्षणाचे आयोजन….
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांकरिता दिनांक:-18/08/2026.
प्रशिक्षणाचे आयोजन….
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचीत नगरसेवकांकरिता महानगरपालिकेमार्फत दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन मा. महापौर श्री. नारायण रतन चौधरी, मा. आयुक्त श्री. अनमोल सागर (भा.प्र.से.), मा. उपमहापौर श्री. तारीक अब्दुल बारी मोमीन यांनी केले.
प्रशिक्षणाच्या सुरवातीस मा. महापौर महोदयांनी नमुद केले की, या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश लोकप्रतिनिधींना महानगरपालिकेच्या कामकाजाची, कायदेशीर तरतुदींची व सभागृहातील कार्यपद्धतीची अधिक सखोल माहिती देणे हा आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग शहराच्या विकासासाठी आणि नागरीकांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी निश्चीत होईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.
तर, आयुक्तांनी सभागृहाला संबोधित करताना नमुद केले की, या प्रशिक्षणाचा मुळ उद्देश सर्व विद्यामान नगरसेवक/नगरसेविका यांना कायद्याच्या तरतुदींची माहिती करुन देणे. शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी कोणत्या तरतुदींचा वापर करता येईल याची माहिती मिळेल. तसेच, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींमुळे प्रशासनाचे कामकाज कसे चालते, त्यावर कशा प्रकारे पर्यवेक्षण करावे याची माहिती मिळले. तसेच, या प्रशिक्षणामुळे नगरसेवकांना केवळ त्यांच्या प्रभागासाठी मर्यादीत दृष्टीकोन न राहता पुर्ण शहरासाठी धोरणात्मक निर्णय घेता येऊ शकेल.
श्री. जीवन सोनावणे, विभागीय संचालक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नाशिक व श्री. एम. बी. खोडके, विभागीय संचालक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, कल्याण यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य, त्यांची प्रशिक्षण पद्धती आणि त्यापासुन होणारे फायदे विषद केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थचे श्री. इंदलकर, प्रशिक्षक हे सर्व नगरसेवकांना प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षण सत्रामध्ये नगरसेवकांचे अधिकार, कर्तव्ये व जबाबदारी याची माहिती देण्यात येणार आहे. आज दिनांक 18.08.2026 रोजी प्रशिक्षणाचे पहिले सत्र सुरू झाले. या सत्रामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदी, सभा कामकाज नियम आणि अर्थसंकल्प वाचन, त्यामधील तरतुदी यांची माहिती देण्यात आली. महानगरपालिकेची बंधनकारक व एैच्छिक कामे कोणती, त्याबाबतच्या तरतुदीची माहिती देण्यात आली. तसेच, दुसऱ्या सत्रामध्ये नगरसेवकांसोबत चर्चा सत्र व प्रश्नोत्तराचे सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये नगरसेवकांच्या शंकाचे निराकरण करण्यात आले. हे प्रशिक्षण सत्र उद्या दिनांक 19.08.2026 देखील सुरू राहणार असल्याचे नगरसचिव श्री. अजय पाटील यांनी सांगितले. या प्रशिक्षणास सर्व नगरसेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
(श्रीकांत परदेशी)
माहिती व जनसंपर्क अधिकारी
मंडी निजामपुर शहर महानगरपालिका भिवंडी
🙏👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 🙏
मेरा देश मेरा वतन समाचार
🙏 पत्र के🙏
संपादक श्री दयाशंकर गुुुप्ता जी
नोट........ 👉🙏
दोस्तों उम्मीद करता हूं कि आप सभी, यह आर्टिकल को अंत तक पढ़े होंगे एवं यह आर्टिकल आपको बेहद पसंद आया होगा, हैं।और अगर लिखने में कोई त्रुटि हुई हो तो क्षमा करें इस के लिए हम आप क्षमा मांगते हैं और हमारे इस आर्टिकल को लाइक करें शेयर करें ? 🙏 जनहित लोकहित के लिए धन्यवाद 🙏
जय संविधान जय भीम जय संविधान का चौथा स्तंभ ने अपने दिल की कुछ प्रमुखताएं या बातें या भावनाएं रखा है अप सभी के बिच में सभी नागरिकों के समक्ष प्रस्तुत किया है और लिखने में कोई त्रुटि हुई है तो क्षमा करें लिखने गलती हुई हैं तो क्षमा करना श्री दयाशंकर गुप्ता जी की तरफ से बहुत-बहुत धन्यवाद🙏







Comments
Post a Comment